भाजप-सेनेच्याच नाही तर क्रिकेट प्रेमींच्याही नागपूरकडे नजरा

भाजप-सेनेच्याच नाही तर क्रिकेट प्रेमींच्याही नागपूरकडे नजरा

महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. राज्यातील या घडामोडीतच क्रिकेट प्रेमींचे लक्ष टी20 मालिकेकडे लागून राहिले आहे.

  • Share this:

नागपूर, 08 नोव्हेंबर : सध्या राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव कसा दूर होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, नागपुरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. याशिवाय नागपुरकडे राजकारणाशिवाय क्रीडा प्रेमींच्याही नजरा लागल्या आहेत. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात टी20 मालिका सुरू आहे.

पहिल्या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा आणि निर्णायक सामना 10 नोव्हेंबरला नागपुरमध्ये होणार आहे.

दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार कमबॅक केला. बांगलादेशनं दिलेले 154 धावांचे आव्हान भारतानं 16 ओव्हरमध्ये पार केले. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं 8 विकेटनं जिंकला. यात रोहित शर्मानं दमदार 85 धावांची दमदार खेळी केली. रोहित आपला 100वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत होता, याच सामन्यात फक्त 23 चेंडूत रोहितनं अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली.

भारतानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांना चांगली सुरुवात करण्यात आली नाही. खलील अहमद महागात पडल्यानंतर चहलच्या फिरकीच्या जाळ्यात बांगलादेशचे खेळाडू अडकले. त्यामुळं भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 153 धावांत अडवले. भारताकडून चहलनं 2 विकेट घेतल्या. तर, बांगलादेशनं दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि धवननं दमदार खेळी केली. दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसं काढत शतकी भागीदारी केली. त्यानंतर धवन 27 चेंडूत 31 धावा करत बाद झाला तर, रोहितनं 43 चेंडूत 85 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी सामन्याची विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, बांगलादेशकडून लिंटन दास आणि मोहम्मद नैम यांनी 60 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सोम्य सरकार आणि मोहम्मदुल्लानं 30 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं बांगलादेशला 153 धावापर्यंत मजल मारता आली.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: November 8, 2019, 11:19 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading