झेल घेण्यासाठी रोहितनं सोडलं जेवण, सराव करत असलेला VIDEO VIRAL

झेल घेण्यासाठी रोहितनं सोडलं जेवण, सराव करत असलेला VIDEO VIRAL

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपहारावेळी इतर खेळाडू जेवत असताना रोहित शर्मा त्याची चूक सुधारण्यासाठी सराव करत होता.

  • Share this:

इंदूर, 16 नोव्हेंबर : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव 130 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 343 धावांची आघाडी होती. भारताने डाव घोषित करून तिसऱ्या दिवशी बांगलादेशला फलंदाजीला पाचारण केलं. त्यानंतर बांगलादेशला 213 धावांत गुंडाळले. या सामन्यात तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने त्याच्याकडून झालेली चूक सुधारण्यासाठी केलेल्या सरावाची चर्चा होत आहे.

तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात बांगलादेशचा फलंदाज मुश्फिकर रहीम फलंदाजी करत होता. त्यावेळी शमीच्या गोलंदाजीवर रोहितने त्याचा सोपा झेल सोडला. यानंतर उपहारासाठी विश्रांती घेण्यात आली. तेव्हा रोहित शर्माने जेवणाच्या वेळेत स्लिपमध्ये झेल घेण्याचा सराव केला. विशेष म्हणजे त्यानंतर आपली आधीच्या सत्रातली चूक सुधारत शमीच्याच गोलंदाजीवर महम्मदुल्लाहचा झेल रोहितनं घेतला. यावेळी त्याने चूक केली नाही आणि झेल टिपला.

पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवशी 86 धावांवर खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाअखेरीस 343 धावांची आघाडी मिळवली आहे. यात मयंक अग्रवालची शानदार खेळी चर्चेचा विषय ठरली. मयंक अग्रवालनं एकहाती भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. मयंक अग्रवालची द्विशतकी खेळी आणि जडेजाचे अर्धशतक यांच्यामुळं भारतानं 493 धावापर्यंत मजल मारली.

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत त्यापैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवाल असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेत विजय मिळवून सलग 12वी कसोटी मालिका जिंकण्याचा कोहली आणि संघाचा प्रयत्न असेल. या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार म्हणून 5 हजार धावा करण्यासाठी 32 धावांची गरज आहे. तर कर्णधार म्हणून सर्वधिक शतक स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्याला आणखी एका शतकाची गरज आहे. सध्या हा विक्रम कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग या दोघांच्या नावावर आहे. या दोघांनी कर्णधारपदावर असताना प्रत्येकी 19 शतके केली आहेत.

त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.

जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या