INDvsBAN : दिल्लीत पावसामुळे खेळाडूंना धोका, BCCI चं टेन्शन वाढलं

INDvsBAN : दिल्लीत पावसामुळे खेळाडूंना धोका, BCCI चं टेन्शन वाढलं

दिल्ली प्रदुषणाच्या विळख्यात सापडली असून 2017 मध्ये लंकेच्या खेळाडूंना जसा त्रास झाला तसा प्रकार बांगलादेशसोबत झाला तर BCCI चं टेन्शन वाढेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याआधी दिल्लीत पाऊस झाला. यामुळे सामना संकटात सापडला आहे. सामन्यावर पावसाचे नाही तर प्रदुषणाचे संकट आहे. दिल्लीत झालेल्या पावसाने प्रदुषण आणखी वाढलं आहे.

हवा प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या दिल्लीत रविवारी सकाळी पाऊस झाला. यामुळे प्रदुषणात वाढ झाली. पावसामुळे प्रदुषण कमी होतं पण त्यासाठी जोरदार पाऊस व्हायला हवा. दिल्लीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानं प्रदुषणाची पातळी 625 वर पोहचली आहे. सरकारी संस्था सफरने सांगितल्यानुसार AQI सकाळी साडेसहा वाजता 410 होता. पाऊस पडून गेल्यानंतर 9 वाजता तो 625 वर पोहचला. ही गोष्ट गंभीर असून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी प्रदुषणाची पातळी 500 च्या आसपास होती पण हलक्या पावसाने यात वाढ झाली.

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात खेळाडूंना दिल्लीतील वाढलेल्या प्रदुषणाचा त्रास होऊ शकतो. खेळाडूंना श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच डोळ्यात जळजळ होण्याची शक्यता आहे. 2017 ध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या लंकेच्या काही खेळाडूंना उलट्या झाल्या होत्या. बांगलादेशविरुद्ध असं काही झालं तर बीसीसीआयसाठी ही बाब लज्जास्पद असेल.

वाचा : 'धोक्याकडे दुर्लक्ष करू नका, तर..', BCCI वर भडकली बॉलिवूड अभिनेत्री

दिल्लीतील सध्याचे वातावरण पाहता पहिल्या टी20 सामन्यावेळी पाऊस होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने दिल्लीत रात्री पाऊस होणार नाही असं सांगितलं आहे. सामन्यात पावसाची शक्यता नसली तरी प्रदुषणाची चिंता आहे.

हरमनप्रीतचा 'सुपरकॅच' पाहून तुम्हीही म्हणाल, म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?

परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पाहा GROUND REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Nov 3, 2019 10:28 AM IST

ताज्या बातम्या