INDvsAUS : टी20 आणि वनडे संघाची घोषणा, पंत-राहुलचे पुनरागमन

INDvsAUS : टी20 आणि वनडे संघाची घोषणा, पंत-राहुलचे पुनरागमन

ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा

  • Share this:

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : बीसीसीआयने  ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. कर्णाधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत खेळणार आहे. तर रोहित शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्याला पुन्हा संघात घेण्यात आलं आहे. त्याच्याशिवाय ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचे पुनरागमन झाले आहे. ऋषभ पंतला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर एकदिवसीय संघात स्थान मिळालं नव्हतं. वादामुळे बाहेर रहावं लागलेल्या केएल राहुललाही संघात स्थान मिळालं आहेत. मात्र या संघात यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा समावेश नाही.

शेवटच्या तीन वनडे सामन्यासाठी ऋषभ पंत, केएल राहुल यांच्याशिवाय भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे. तर कौलला वगळण्यात आलं आहे.

पहिल्या दोन वनडे सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी(यष्टीरक्षक), हार्दीक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांच्यासह ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल आणि केएल राहुल यांना संधी दिली आहे.

शेवटच्या तीन सामन्यासाठी विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी(यष्टीरक्षक), हार्दीक पांड्या, जसप्रीत बुमराह, विजय शंकर, मोहम्‍मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात दोन टी20 सामन्यांनी होणार आहे. याचेही नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. यात उमेश यादव, सिद्धार्थ कौल यांच्यासह मयंक मार्कंडेयला संधी देण्यात आली आहे.

टी20 संघ : विराट कोहली(कर्णधार),रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह, विजय शंकर युजवेंद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल आणि मयंक मार्कंडेय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 05:53 PM IST

ताज्या बातम्या