Elec-widget

विराट कोहलीने जे केलं ते या भारतीय कर्णधारांना जमलंच नाही

आज आम्ही तुम्हाला विराटच्याआधी ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेल्या कर्णधारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या पदरी ऑस्ट्रेलियात फक्त निराशाच पडली.

  • Share this:

ऑस्ट्रेलियाच्या मैदानात कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार झाला आहे. गेल्या ७० वर्षात कोणत्याही भारतीय तसेच आशियाई कर्णधाराला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणं शक्य झालं नाही. आज आम्ही तुम्हाला विराटच्याआधी ऑस्ट्रेलियाचा दौरा केलेल्या कर्णधारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या पदरी ऑस्ट्रेलियात फक्त निराशाच पडली.

स्वातंत्र्यानंतर लगेच लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. डॉन ब्रॅडमेन यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने भारताचा ०-४ अशा दारुण पराभव केला होता.

भारताचा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा १९ वर्षांनंतर १९६७-६८ मध्ये झाला. या मालिकेत सुरुवातीला चंदू बोर्डे आणि नंतर टायगर पतोडी यांनी संघाचं नेतृत्व केलं होतं. भारताला या मालिकेतही ०-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता.

Loading...

१९७७-७८ मध्ये बिशनसिंह बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी सामन्यात पहिल्यांदा विजय मिळवला. मालिकेतील पहिले दोन सामने हरल्यानंतर भारतीय संघाने पुढील दोन सामन्यात विजय मिळवला. मात्र शेवटची कसोटी हरल्यामुळे भारताने ही मालिका २-३ अशी गमावली. कर्णधार बेदी आणि चंद्रशेखर यांच्या अफलातून गोलंदाजीसाठी आजही क्रिकेट चाहत्यांच्या ही मालिका लक्षात आहे.

१९८०- ८१ मध्ये सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पराभवाचा सामना करावा लागला नव्हता. पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना अनिर्णित ठेवण्यात भारताला यश मिळाले होते. तर तिसरा आणि शेवटचा सामना भारताने जिंकून मालिका बरोबरीत सोडवली होती.

१९८५-८६ मध्ये कर्णधार कपिल देव यांच्या अष्टपैलू प्रदर्शनामुळे भारतीय संघ तीनही सामने अनिर्णित ठेवण्यात यशस्वी झाला होता.

१९९१- ९२ च्या दौऱ्यात सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात पहिले शतक झळकावले होते. तेंडुलकरला सोडून एकहा भारतीय खेळाडूला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. अखेर भारताला या मालिकेत ०-४ असा पराभव सहन करावा लागला. या संघाचा कर्णधार मोहम्मद अजरुद्दीन होता.

जवळपास नऊ वर्षांनी भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. यावेळी सचिन तेंडुलकर कर्णधार होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला व्हाइट वॉश (३-०) दिला.

२००३-०४ च्या दौऱ्यात पहिल्यांदा टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या अगदी जवळ होती. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर राहुल द्रविडच्या अफलातून फलंदाजीमुळे भारताने दुसरा सामना जिंकला. मात्र तिसऱ्या सामन्यात पराभव आणि चौथा सामना अनिर्णित राहिल्यामुळे सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.

२००७- ०८ चा दौरा मंकी गेटमुळे आजही लक्षात आहे. तेंडुलकर, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण यांच्या उपस्थितीत अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मालिका जिंकेल असेच वाटत होते. मात्र या दौऱ्यातही भारताचा १-२ असा पराभव झाला.

२०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला ०-४ असा पराभव सहन करावा लागला.

२०१४- १५ मध्ये भारताने धोनीच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात धोनीने कर्णधारपद सोडले होते. यानंतर धोनीची जागा विराट कोहलीने घेतली होती. भारताने ही मालिका ०-२ अशी हरली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...