मुंबई, 3 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारी पासून या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय खेळाडू यासाठी सज्ज होत आहेत. अशातच भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा सध्या जीममध्ये घाम गाळत असून त्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना पारपडले. यासाठी क्रिकेटपटू नागपूरला दाखल होत असून शुक्रवारी विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघे नागपूरला पोहोचले. विराट कोहलीने काही तासांपूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर जिम मध्ये वर्क आउट करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
भारताचा कसोटी संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन , आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Test cricket, Virat kohli