....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, ब्रिस्बेनच्या कामगिरीनंतर चिन्मय मांडलेकरला आठवला तो विजय

....ड्रेसिंग रूममध्ये फक्त त्याची कमी होती, ब्रिस्बेनच्या कामगिरीनंतर चिन्मय मांडलेकरला आठवला तो विजय

IND vs AUS: मराठी चित्रपट सृष्टीतला आघाडीचा कलाकार चिन्मय मांडलेकरनेही (Chinmay mandlekar) टीम इंडियाला (Team india)अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शुभेच्छा देताना चिन्मयला सौरंभ गांगुलीच्या लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी सामन्याची आठवण झाली.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी : टीम इंडियाने (Team India) ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन इतिहास घडवला आहे. ब्रिस्बेनमध्ये शेवटपर्यंत रंगलेल्या चुरशीचा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकला. या विजयाबरोबरच ब्रिस्बेनमध्ये 32 वर्ष अपराजित राहण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रमही भारतीय टीमनं मोडला आहे. तसंच, सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर (Border-Gavasakar ) ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडियावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत मराठी कलाकारांनी भारतीय संघांच तोंड भरून कौतुक केलं आहे.

यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतला आघाडीचा कलाकार चिन्मय मांडलेकरनेही टीम इंडियाला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शुभेच्छा देताना चिन्मयला सौरंभ गांगुलीच्या लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटी सामन्याची आठवण झाली. त्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'या ऐतिहासिक सामन्यात आज ड्रेसिंग रुमच्या गॅलरीमध्ये दादाने टीशर्ट हवेत फिरवण्याची फक्त कमतरता होती. बाकी सब कडकककक!

2002 साली लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात भारताने अभूतपूर्व कामगिरी केली होती. सुरूवातीला टीम इंडियाच्या विकेट्स पडल्यानंतर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफने भारताला सावरलं होतं. या दोघांनी अगदी कठिण परिस्थितीत मैदानात उतरून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. यावेळी हा विजय साजरा करताना कप्तान सौरभ गांगुलीने मैदानात टी शर्ट काढत आनंद साजरा केला होता.

कालच्या भारताच्या विजयानंतर क्रिकेटचा दादा सौरभ गांगुलीने टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. यावेळी सौरभ गांगुलीने BCCI चा अध्यक्ष या नात्याने वियजी संघाला 5 कोटींचा बोनस देखील जाहीर केला आहे. यावेळी दादाने ट्वीट करताना म्हटलं की, 'भारताचा हा विजय अविस्मरणीय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जावून अशाप्रकारचा विजय खेचून आणणं खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायमस्वरुपी लक्षात राहिल. या आनंदाच्या क्षणी BCCI विजयी संघाला 5 कोटींचा बोनस जाहीर करण्यात येत आहे. या विजयाचं मोल आकड्याच्या पलिकडलं आहे.'

Published by: News18 Desk
First published: January 20, 2021, 4:21 PM IST

ताज्या बातम्या