'तुझ्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली', पृथ्वी शॉ आणि रवी शास्त्रींवर भन्नाट मिम्स VIRAL

'तुझ्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली', पृथ्वी शॉ आणि रवी शास्त्रींवर भन्नाट मिम्स VIRAL

ऑस्ट्रेलियाच्या भेदक बॉलिंगपुढे भारताची बॅटिंग कोसळली, भन्नाट मिम्स VIRAL

  • Share this:

ऍडलेड, 19 नोव्हेंबर :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या 36 धावांमध्ये अख्खा संघ तंबूत परतला आहे. कसोटी सामन्याच्या इतिहास पहिल्यांदाच एवढा कमी स्कोर भारतीय संघानं मिळवला आहे. यापूर्वी 1974मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 42 धावा केल्या होत्या. अवघ्या 42 धावांवर भारतीय संघाचे सर्व खेळाडू तंबूमध्ये परतले होते. आता हा रेकॉर्ड संघानं मोडला असून अवघ्या 36 धावांवर पूर्ण संघाला माघारी परताव लागलं आहे

भारतीय संघाच्या लाजीरवाणी कामगिरीनंतर सोशल मीडियावर तुफान मिम्स व्हायरल झाले आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सोशल मीडियावर टार्गेट केलं जात असून त्यांच्यावर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. या मिम्समध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याचा फ्लॉप शोला संधी दिल्यामुळे शास्त्री यांनाही टार्गेट केलं जात असल्याचं या मिम्समधून पाहायला मिळत आहे.

हे वाचा-IND vs AUS: ….आणि पुन्हा जाग्या झाल्या ‘ऑल आऊट 42’ च्या आठवणी!

ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 तर पॅट कमिन्सने 4 विकेट घेतल्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन शून्य रनवर आऊट झाले. तर पृथ्वी शॉ 4, मयंक अगरवाल 9, जसप्रीत बुमराह 2, विराट कोहली 4, हनुमा विहारी 8 रन, ऋद्धीमान साहा 4 रनवर आऊट झाले. तर मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट झाला. या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला दोन आकडी संख्या गाठता आली नाही. भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 90 रनचं आव्हान मिळालं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 19, 2020, 11:37 AM IST

ताज्या बातम्या