Home /News /sport /

IND vs AUS: रोहित शर्मासह पाच खेळाडूंना पाळावी लागणार ‘ही’ अट

IND vs AUS: रोहित शर्मासह पाच खेळाडूंना पाळावी लागणार ‘ही’ अट

नव्या वर्षात रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यामुळे रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच भारतीय खेळाडू अडचणीत आले होते.

    सिडनी, 4 जानेवारी :  नव्या वर्षात रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यामुळे रोहित शर्मासह (Rohit Sharma) पाच भारतीय खेळाडू अडचणीत आले होते. आता हे सर्व भारतीय टीमसह (Team India) सिडनीमध्ये रवाना झाले आहेत. मात्र त्याचवेळी त्यांना टीमसोबत सराव करण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. रोहित शर्मासह शुभमन गिल, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि ऋषभ पंत या पाच खेळाडूंना हे नियम पाळावे लागणार आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलेल्या वृत्तानुसार या पाचही खेळाडूंना टीममधील सरावाच्या दरम्यान इतर सहकाऱ्यांपासून पुरेसं अंतर (Social Distancing) राखावं लागणार आहे. 18 यार्डापेक्षा जास्त अंतरानं बॉलिंग कराणे तसेच फिल्डिंगच्या दरम्यान सुरक्षित अंतर ठेवण्याची सूचना या खेळाडूंना देण्यात आली आहे. BCCI नं फेटाळले आरोप भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) खेळाडूंनी नियम तोडल्याच्या बातम्या निराधार असल्याचं स्पष्ट केलं होतं. भारतीय क्रिकेट बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘भारतीय संघ कोव्हिड -19 नियमांविषयी चांगलाच जागरुक आहे. त्यांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंनी जैविक दृष्ट्या सुरक्षित नियमांचं कोणतही उल्लंघन केलं नाही. संघाशी संबंधित असलेला  प्रत्येक व्यक्ती कोरोना नियमांबद्दल चांगल्या प्रकारे परिचित आहे.’ मालिका निर्णायक वळणावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सिडनीमध्ये सात जानेवारीपासून होणार आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमचा नवा उपकर्णधार रोहित शर्मा खेळणार हे स्पष्ट आहे. मयंक अग्रवाल किंवा हनुमा विहारीपैकी एकाच्या जागेवर रोहितची टीममध्ये निवड होईल. मेलबर्न टेस्टमध्ये जखमी झालेल्या उमेश यादवच्या जागेसाठी शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी आणि नटराजन असे तीन पर्यात टीम मॅनेजमेंटसमोर आहेत. या मालिकेतील पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्या टेस्टमध्ये टीम इंडियाची दुसरी इनिंग 36 रन्सवरच संपुष्टात आली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली भारतीय टीमनं मेलबर्नमध्ये कमबॅक केलं आणि ती टेस्ट आठ विकेट्सनं जिंकली. त्यामुळे सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या