Home /News /sport /

आजीला पेढे भरवले आणि घराघरात फोडले फटाके, पाहा थेट अजिंक्य रहाणेच्या गावातला जल्लोषाचा VIDEO

आजीला पेढे भरवले आणि घराघरात फोडले फटाके, पाहा थेट अजिंक्य रहाणेच्या गावातला जल्लोषाचा VIDEO

कोहलीच्या अनुपस्थितीत टीमचा कप्तान म्हणून खेळणारा मराठमोळा अजिंक्य रहाणे नावाप्रमाणेच अद्याप अजिंक्य राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनपेक्षित विजय खेचून आणल्यानंतर त्याच्या मूळच्या गावात कसं सेलिब्रेशन झालं पाहा VIDEO

    अहमदनगर, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs Australia) रोमांचक विजय झाला आहे. या ऐतिहासिक विजयासोबतच भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफीही 2-1 ने खिशात घातली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीमचा कप्तान म्हणून खेळणारा मराठमोळा अजिंक्य रहाणे  (Ajinkya Rahane) नावाप्रमाणेच अद्याप अजिंक्य राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियातला हा अनपेक्षित विजय खेचून आणल्यानंतर जगभरातल्या क्रिकेट रसिकांमध्ये रहाणेची वाहवा होत असताना त्याच्या गावाला तर हा आनंद कसा आणि किती साजरा करायचा असाच प्रश्न पडलेला दिसतो. खरंतर विराट कोहली (Virat Kohli)च्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) तरण्या पोरांना एकत्र घेवून हा ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. अजिंक्यचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. हा सामना जिंकल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांपासून बॉलीवूडच्या अनेक कलाकारांपर्यंत अनेकांनी टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहेच, पण रहाणेच्या मूळ गावात काय परिस्थिती आहे याची झलक या VIDEO तून बघता येईल. अजिंक्य रहाणेचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातलं चंदनपुरी हे आहे. शिक्षण आणि क्रिकेट प्रशिक्षणासाठी त्याचं कुटुंब मुंबईत, डोंबिवलीत राहिलं, पण अजिंक्यचं कौतुक त्याच्या गाववाल्यांना प्रचंड आहे. आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या अजिंक्य रहणेच्या नेतृत्वात भारतीय संघ विजयी भरारी मारत होता, तेव्हा त्याच्या गावातल्या घराघरात टीव्हीवर ब्रिस्बेनमधली त्याची करामत पाहिली गेली.  ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर यजमानांना धूळ चारल्यानंतर या विजयाचा जल्लोष अजिंक्य राहणेच्या मुळ गावीही पाहायला मिळाला. चंदनपुरीच्या गावकऱ्यांनी सामना संपताच फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. अजिंक्यच्या आजीला पेढे भरवण्यात आले आणि  या आनंदोत्सवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या