नवी दिल्ली, 20 जानेवारी: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (IND VS AUS) गेलेल्या भारतीय संघाला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला. पण दौऱ्याचा शेवट गोड आला. भारताने अनेक अडचणींचा सामना करत ही अवघड मालिका खिशात घातली. या टीमकडे पाहून कोणालाही वाटलं नव्हतं की, ही टीम अनुभवी ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्याच धर्तीवर अशाप्रकारे लोळवेलं. पण भारतीय संघाने हे करून दाखवलं आहे. त्याचं कौतुक ऑस्ट्रेलियन क्रिकेट फॅन्सनाही वाटलं आणि त्यांनी ते कशा प्रकारे दाखवून दिलं त्याचा हा VIDEO. तुमचाही ऊर भरून येईल ऑस्ट्रेलियन माणसाच्या तोंडून भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा ऐकताना.
अॅडलेडला झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघावर अनेक स्तरातून टीकेची झोड उठवली गेली. तसंच या दौऱ्यात भारताचे महत्त्वाचे एकूण अकरा खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये अनुभवी ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेला संघ नवखाचं होता. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे प्रत्येक टीकाकारांची आता बोलती बंद झाली आहे. एवढंच काय ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट चाहतेही भारतीय संघाच्या कामगिरीवर खुश असल्याचं पाहायला मिळालं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची जर्सी घातलेला एक क्रिकेट चाहता, 'भारत माता की जय', आणि 'वंदे मातरम' च्या घोषणा देत आहे. आपला संघ हरलेला असतानाही, या क्रिकेट चाहत्याने दाखवलेल्या खिलाडू वृत्तीचं कौतुक अनेक स्तरातून होत आहे.
अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये छत्तीसगड राज्यात अतिरिक्त वाहतूक आयुक्त असलेले आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्वीट करताना लिहिलं की, 'हे भारतीय आहेत, खेळासोबतचं लोकांचं हृदयही जिंकतात. हा क्षण अंगावर रोमाचं निर्माण करणारा आहे. या सामन्यानंतर हृदयाला हात घालणारे काही क्षण.'
#India वाले हैं, खेल के साथ दिल भी जीतेंगे!😎
Feel the Goosebumps.
Some heart warming moments in Australia after #IndVsAus match.
VC- Social Media.#AUSvsIND #GabbaTest #TeamIndia @cricketaakash pic.twitter.com/XT7FklQjO7
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 19, 2021
हा व्हिडिओ आतापर्यंत दोन हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. जवळपास 250 लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.