Ind vs Aus: आक्षेपार्ह गोलंदाजीमुळे हा भारतीय खेळाडू येऊ शकतो अडचणीत

Ind vs Aus: आक्षेपार्ह गोलंदाजीमुळे हा भारतीय खेळाडू येऊ शकतो अडचणीत

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४ धावांनी पराभव केला.

  • Share this:

सिडनी, १३ जानेवारी २०१९- भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४ धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही भारताच्या अडचणी कमी होत नसून वाढतच जात आहेत. सिडनी येथील एकदिवसीय सामन्यात गोलंदाज अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आता रायडूला करावं लागेल हे काम

रायडूने सिडनी एकदिवसीय सामन्या दरम्यान दोन षटकांची गोलंदाजी केली होती. या दोन षटकांमध्ये त्याने १३ धावा दिल्या होत्या. मोहम्मद शमीच्या खांद्याला आणि पाठीला झालेल्या दुखापतीमुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं. त्याला शमीच्या जागी गोलंदाजीची जबाबदारी दिली होती. आता या सामन्यानंतर रायडूच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ३३ वर्षीय पार्ट- टाइम ऑफस्पिनरल येत्या १४ दिवसांच्या आत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. मात्र चाचणीचा निर्णय येईपर्यंत रायडू आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करू शकतो.

जर रायडू चाचणीत फेल झाला तर त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर आजन्म बंदी येऊ शकते. रायडू एक फलंदाज म्हणून भारतीय संघात खेळतो, मात्र कधी कधी तो गोलंदाजीही करतो. त्याने आतापर्यंत भारतासाठी ४६ मालिकांच्या ९ सामन्यांमध्ये तीन गडी बाद केले आहेत. रायडूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २२ व्या आणि २४ व्या षटकांत गोलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उस्मान ख्वाजा आणि शॉर्न मार्श फलंदाजी करत होते.

ट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख

First published: January 13, 2019, 2:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading