मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पहिल्या टी-20 मध्ये कार्तिकचा गळा पकडलेल्या रोहितने आता काय केलं? हा Video पाहाच

पहिल्या टी-20 मध्ये कार्तिकचा गळा पकडलेल्या रोहितने आता काय केलं? हा Video पाहाच

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेटने विजय झाला आहे. भारताची फिल्डिंग सुरू असताना कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक यांच्यातलं बॉण्डिंग पाहायला मिळालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Hyderabad, India
  • Published by:  Shreyas

हैदराबाद, 26 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेटने विजय झाला आहे. या विजयासोबतच भारताने 3 टी-20 मॅचची ही सीरिज 2-1 ने जिंकली. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. सूर्या आणि विराटच्या साथीने भारताने 187 रनचं आव्हान भारताने पार केलं. सूर्याने 36 बॉल्समध्ये 5 फोर आणि 5 सिक्सर्सच्या मदतीनं 69 रन्स फटकावले. सूर्या आणि विराट यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 104 रनची पार्टनरशीप झाली. विराटने 48 बॉल्समध्ये 3 फोर आणि 4 सिक्ससह 63 रन्सचं योगदान दिलं.

या सामन्यात भारताने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताची फिल्डिंग सुरू असताना कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक यांच्यातलं बॉण्डिंग पाहायला मिळालं.

दिनेश कार्तिकने अक्षर पटेलच्या बॉलिंगवर उत्कृष्ट रनआऊट केलं, त्यावेळी रोहित शर्माने दिनेश कार्तिकच्या हेल्मेटला किस केलं. रोहित आणि कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टी-20 सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यातला जबरदस्त ब्रोमान्स चाहत्यांना पाहायला मिळाला. पहिल्या टी-20 मध्ये रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा गळा पकडला होता, याचे बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दुसऱ्या टी-20 मध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकच्या जोडीनेच भारताला विजय मिळवून दिला होता. पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, त्यानंतर रोहितच्या टीमने सीरिजमध्ये धमाकेदार कमबॅक केलं.

First published:

Tags: India vs Australia, Rohit sharma