मुंबई, 22 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. चेन्नई येथील स्टेडियमवर या मालिकेतील तिसरा सामना पारपडला असून या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी हा सामना जिंकला असून मालिकेत 2-1 ने आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला. या सामन्यात टी 20 क्रिकेटमध्ये हिट ठरणारा भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सलग तिसऱ्या वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला.
2022 या वर्षात आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाज ठरलेला सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचे खाते देखील उघडू शकला नाही. टी 20 क्रिकेटमध्ये चौकार शटकारांची अतिशबाजी करणाऱ्या सूर्याची बॅट मात्र वनडे क्रिकेटमध्ये मात्र शांतच पहायला मिळाली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील मुंबई आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या दोन सामन्यात सूर्या शून्य धावांवर बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असताना सूर्यकुमार यादव भारतासाठी फलंदाजीत योगदान देऊ शकला नाही.
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका, भारताचा होमग्राऊंडवर पराभव
चेन्नई येथील तिसऱ्या सामन्यात देखील सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आल्यावर ऑस्ट्रेलियाच्या अॅश्टनने त्याला क्लिमी बोल्ड केले. वनडे क्रिकेटमधील सूर्याच्या सततच्या फ्लॉप परफॉर्मन्समुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Suryakumar yadav