मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका, भारताचा होमग्राऊंडवर पराभव

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिका, भारताचा होमग्राऊंडवर पराभव

ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय! सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव

ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय! सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा दारुण पराभव

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येत आहे. चेन्नई येथील स्टेडियमवर या मालिकेतील तिसरा सामना पारपडला असून या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येत आहे. चेन्नई येथील स्टेडियमवर या मालिकेतील तिसरा सामना पारपडला असून या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी हा सामना जिंकला असून मालिकेत 2-1 ने आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 270 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पूर्ण करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. परंतु 10 व्या षटकात भारताची धाव संख्या 65 असताना कर्णधार रोहित शर्मा झेल बाद झाला. त्याच्यानंतर लगेचच 13 व्या षटकात युवा क्रिकेटर शुभमन गिलची देखील विकेट पडली. त्यानंतर के एल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयन्त केला. विराटने 72 चेंडूत 54 धावा केल्या. तर के एल राहुल 32 धावा करून बाद झाला. त्यांनंतर हार्दिक पांड्याने 41 धावा करून भारताला लक्ष्याच्या जवळ पोहोचवण्यासाठी मदत केली परंतु अखेर स्टीव स्मिथ याने त्याचा झेल पकडला. तसेच रवींद्र जडेजाने 18 आणि मोहम्मद शमीने 14 धावा केल्या. परंतु अखेर ऑस्ट्रेलियाला भारताच्या 10 विकेट घेण्यात यश आले आणि ऑस्ट्रेलीयाचा 21 धावांनी विजय झाला.

WPL 2023 : RCB ला स्मृती मानधना पडली महागात! एका रन साठी मोजले तब्बल इतके पैसे!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेत भारताने मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला होता. परंतु विशाखापट्टणम येथील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर आज चेन्नई येथील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Rohit sharma