मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु असून आज या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात त्याने त्याच्या चाहत्याला लग्नासाठी प्रपोज केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग नव्हता. पत्नी रितिका सजदेह हिच्या भावाच्या लग्नासाठी रोहित शर्माने वनडे मालिकेतील काही दिवस ब्रेक घेतला. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या याने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. परंतु विशाखापट्टणम येथील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्मा टीम इंडियात परतला आहे. यादरम्यान रोहितचा एअर पोर्टवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात त्याने आपल्या चाहत्याला लग्नासाठी प्रपोज केले.
Rohit Sharma is an amazing character - what a guy! pic.twitter.com/YZzPmAKGpk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 19, 2023
झालं असं की, रोहित शर्मा टीम सह एअर पोर्टवर उतरून बसच्या दिशेने जात होता. अशातच टीम इंडियाचे चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी तेथे पोहोचले. यावेळी रोहित शर्माचा चाहता त्याचा व्हिडिओ काढत होता. यावेळी रोहित तेथून जात असताना चाहत्याच्याजवळ गेला आणि त्याने हातातील गुलाबाचं फुल चाहत्याला ऑफर करून 'तू माझ्याशी लग्न करशील का?' असे विचारले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Rohit sharma