मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या वनडे मालिका सुरु आहे. विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्सने पराभव करून विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.
भारताने विजयासाठी 50 षटकात 118 धावांच ठेवलेलं ऑस्ट्रेलिया संघाचे अवघ्या 11 षटकात 10 विकेट्स राखून पूर्ण केलं. सामन्याच्या सुरुवातीला णनफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आव्हान दिले. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सुरुवातीपासूनच घसरण लागली. सलामीची कर्णधार रोहित शर्मासोबत आलेला भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल शुन्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ रोहितची देखील चौथ्या षटकात विकेट पडली. त्यालाही संघासाठी 13 धावांचेच योगदान देता आले. रोहितनंतर बाद होणाऱ्या फलंदाजांची रांगच लागली.
हातात गुलाबाचं फुल, अनं रोहित शर्माने चाहत्याला थेट लग्नासाठी केलं प्रपोज, Video Viral
विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल सोडून इतर कोणत्याही फलंदाजाला 2 अंकी धाव संख्या करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट मिचेल स्टार्क याने घेतल्या. त्याने 5 विकेट घेत भारताच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं. तर त्यासोबतच शॉन अॅबॉटने 3 आणि नॅथन एलिस याने 2 विकेट घेतल्या.
विजयासाठी 117 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क हे दोघे मैदानात उतरले. परंतु अखेर पर्यंत भारतीय गोलंदाजांना त्यांची भागीदारी तोडता आली नाही. ट्रॅव्हिस हेड याने 51 तर मिचेल स्टार्क याने 66 धावा करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करून वनडे मालिकेत 1-1 ने आघाडी मिळवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia