मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS 1st Test: सूर्यकुमार यादवसह दोघांचे कसोटी पदार्पण

IND vs AUS 1st Test: सूर्यकुमार यादवसह दोघांचे कसोटी पदार्पण

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह उतरला आहे.

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह उतरला आहे.

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह उतरला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर, 09 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांना संधी दिली असून दोघांनीही कसोटीत पदार्पण केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला हे बक्षीसच मिळालं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इशान किशनला संधी मिळाली नाही.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह उतरला आहे. नागपूरची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे चौथ्या डावात फलंदाजी करणं भारतासाठी सोपं नसेल.

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी टी२० क्रिकेटमध्ये १ हजार पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० मध्ये इतक्या धावा कोणत्याही फलंदाजाला करता आल्या नव्हत्या. यात त्याच्या दोन शतकांचा समावेश होता.

२०२३ मध्येही त्याने शतक केले होते. टी२० मध्ये मैदान गाजवल्यानंतर आता कसोटीत चमक दाखवण्यासाठी सूर्यकुमार यादव मैदानात उतरला आहे. याआधी रणजी ट्रॉफीत खेळताना त्याने दोन सामन्यात अर्धशतके केली आहेत.

IND vs AUS : जावई आमचा भला! नागपूरकरांनी द्रविडचं ऐकलं, मॅचपूर्वी झाला मोठा बदल

भारताचा यष्टीरक्षक केएस भरत २०१९ पासून टीम इंडियासोबत होता, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. ऋषभ पंतच्या अपघातानंतर भरतचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक केलं आहे.

तर रणजी ट्रॉफीत त्रिशतक करणारा तो पहिला यष्टीरक्षक फलंदाज आहे. आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या भरतने २०१४ मध्ये गोव्याविरुद्ध ३११ चेंडूत २०८ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ३८ चौकार आणि ६ षटकार मारले होते.

First published:

Tags: Suryakumar yadav, Team india