नागपूर, 09 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे आघाडीचे फलंदाज भारताने लवकर बाद केले. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्युशेन यांनी डाव सावरला. पण भारताच्या फिरकीपटूंनी धावांच्या गतीला ब्रेक लावला. ऑस्ट्रेलियाच्या ३२ षटकात २ बाद ७६ धावा झाल्या होत्या.
जडेजाने स्मिथला टाकलेल्या षटकांमध्ये टिच्चून मारा केला. यावेळी स्टिव्ह स्मिथने जडेजाचे कौतुकसुद्धा केलं. चेंडू बॅटला न लागता मागे गेल्यानंतर स्मिथने जडेजाचं कौतुक करताना अंगठा वर करून Well Bowled असाच इशारा केल्याचं दिसतंय. स्टिव्ह स्मिथ आणि लॅब्युशेन यांनी ३२ षटकात ७० धावांची भागिदारी केली. यात लॅब्युशेनने ११० चेंडूंचा सामना करताना ४७ धावा केल्या तर स्टिव्ह स्मिथने ७४ चेंडूत १९ धावा केल्या.
हेही वाचा : IND VS AUS : रोहितने घेतला धोनीसारखा निर्णय, टीम इंडियाला मिळाली विकेट
ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन दणके
मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला डावाच्या दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर दणका दिला. त्याने उस्मान ख्वाजाला पायचित केलं. तो फक्त एका धावेवर बाद झाला. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुढच्याच षटकात डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. त्याने पाच चेंडूत एक धाव केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket