नागपूर, 09 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतला पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन फलंदाज फक्त ६ धावात बाद झाले. पहिली विकेट दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर गेली. मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला टाकलेल्या या चेंडूवर पायचितचं जोरदार अपील केलं होतं.
सिराजचं अपील मैदानावरील पंचांनी फेटाळून लावलं होतं. मात्र मोहम्मद सिराजला ख्वाजा बाद असल्याची खात्री होती. रोहित शर्माने तेव्हा यष्टीरक्षक केएस भरतसोबत बोलून रिव्ह्यू घेतला. बॉल ट्रॅकरवर तीन रेड दिसले. शेवटी रिव्ह्यूमध्ये ख्वाजा बाद असल्याचं दिसल्यानंतर मैदानावरील पंचांनी निर्णय बदलला.
हेही वाचा : IND VS AUS 1st Test : सिराजनंतर शमीने दिला ऑस्ट्रेलियाला दणका, वॉर्नरचा उडवला त्रिफळा
रोहित शर्माने डीआरएसच्या घेतलेल्या निर्णयाचं आता सोशल मीडियावर कौतुक होत आहे. धोनीप्रमाणेच रोहित शर्माने हुशारी दाखवत डीआरएस घेतल्याने भारताला पहिली विकेट मिळाली असं चाहत्यांनी म्हटलं आहे .
उस्मान ख्वाजा फक्त १ धाव करून बाद झाला. त्यानंतर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला दुसरा दणका दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवला. वॉर्नर पाच चेंडूत १ धाव करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने त्यांचे दोन्ही सलामीवीर लागोपाठ गमावल्याने त्यांची अवस्था २ बाद सहा अशी झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket