India vs Australia 1st Test, 2nd Day- दुसऱ्या दिवसा अखेरीस ऑस्ट्रेलिया १९१/ ७

भारतासाठी आतापर्यंत आर. अश्विनने सर्वाधित ३ गडी बाद केले. त्यानंतर इशांत शर्माने आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2018 01:07 PM IST

India vs Australia 1st Test, 2nd Day- दुसऱ्या दिवसा अखेरीस ऑस्ट्रेलिया १९१/ ७

एडिलेट, ०७ डिसेंबर २०१८-  दुसऱ्या दिवसा अखेरीस ८७ षटकांत ७ गडी गमावत ऑस्ट्रेलियाने १९१ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे ७ गडी बाद झाले असतील, तरी त्यांचा युवा खेळाडू ट्रेविस हेड अजूनही मैदानात जम बसवून आहे. भारतासाठी आतापर्यंत आर. अश्विनने सर्वाधित ३ गडी बाद केले. त्यानंतर इशांत शर्माने आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन गडी बाद केले.


दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या सेशलमध्ये टी ब्रेकपर्यंत २८ षटकात २ गडी गमावत ६० धावा केल्या. यासोबत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा स्कोअर ११७/ ४ होता. त्यावेळी हँडसकॉम्ब ३३ आणि हेड १७ धावांवर खेळत होता.


टीम इंडियाला ऑल आऊट केल्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला झटका एरॉन फिंचच्या रुपात (०) बसला. पहिल्याच षटकात इशांतने फिंचला बोल्ड केले. फिंच बाद झाल्यानंतर मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा यांनी मैदानात जम धरला होता. या जोडीला बाद करायला टीम इंडियाला फार प्रयोग करावे लागत होते. मात्र, २२ व्या षटकात आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मुरली विजयने हॅरिसला झेल बाद केले. हॅरिसने ५७ चेंडूत २६ धावा केल्या होत्या.

Loading...


एडिलेड कसोटीत भारताचा २५० धावा करुन ऑल आऊट झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा शेवटचा फलंदाज फलंदाजी करायला मैदानात उतरला. मात्र पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. हेजलवूडच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीला टिम पेनकरवी झेल बाद केले. पहिल्या डावात हेजलवूडने सर्वाधिक तीन गडी बाद केले.


एडिलेट कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. भारताने पहिल्या दिवशी ९ गडी गमावत २५० धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाची लाज राखत आपल्या करिअरमधील १६ वे शतक साजरे केले. त्याने २४६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १२३ धावा केल्या.


भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.


ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवूड, नाथन लियोन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...