मुंबई, 18 मार्च : भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने नेतृत्व केलं. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळाला. पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना पांड्याने कमाल केली. तसंच ऑस्ट्रेलियन संघाला १८८ धावात रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या डावावेळी हार्दिक पांड्याचा संताप अनावर झाल्याचं दिसून आलं.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. मोहम्मद सिराजने सुरुवातीलाच ट्रेव्हिस हेडचा त्रिफळा उडवला. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि मार्शने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे गडी ठराविक अंतराने बाद होत गेले.
IND vs AUS 1st ODI : के एल राहुलचा कॅच पाहून प्रेक्षकांना आली धोनीची आठवण, पाहा Video
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सहाव्या षटकात सिराजला रनअपवेळी थांबावं लागलं. कारण कर्णधार स्टिव्ह स्मिथला साइट स्क्रीनकडे काही त्रासदायक वाटलं. क्रिकेटच्या मैदानावर असं काही होणं ही सामान्य बाब आहे. साइट स्क्रीनच्या आजूबाजूला हालचाल झाल्यास फलंदाज लक्ष केंद्रीत करू शकत नाही.
सहाव्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला. त्याच्याही षटकात असाच प्रकार घडल्याने तो नाराज झाला. हार्दिक पांड्या तिसरा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत होता. पण मधेच मिशेल मार्शने त्याला थांबवलं. स्मिथ प्रमाणेच त्यालाही साइट स्क्रीनची अडचण झाली. गोलंदाजीसाठी मागे जाताना पांड्या पंचांसोबत काही बोलताना दिसला. यावेळी पांड्या संतापल्याचंही दिसत होतं. पांड्याचा हा राग ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर होता की साइट स्क्रीनमुळे होणाऱ्या त्रासाबाबत होता हे स्पष्ट झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket