नवी दिल्ली, 19 जानेवारी : इंडिया आणि ऑस्ट्रेलिया(Ind vs Aus) दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताने 4 मॅचची बॉर्डर-गावसकर मालिका (Border Gavasker Trophy) 2-1 च्या फरकाने जिंकली आहे. इंडियन टीमच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Championship) देखील मोठी उलथापालथ झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर इंडियन टीमने या क्रमवारीत पहिले स्थान पटकावलं आहे.
बॉर्डर–गावसकर सीरिज (Border Gavasker series) सुरू होण्यापूर्वी इंडियन टीम क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र, ब्रिस्बेन येथील विजयाने इंडियन टीम 71.7 गुणांसह पहिल्या नंबरवर पोहोचली आहे. न्यूझीलंड 70 गुणांसह दुसऱ्या नंबरवर आहे. ऑस्ट्रेलियन टीमला याचा मोठा फटका बसला असून त्यांची थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यामुळे आता इंग्लंडविरुद्ध आगामी काळात मायदेशात होणाऱ्या सीरिजमध्ये विजय मिळवत ही कामगिरी टिकवून ठेवण्याचे इंडियन टीमचे लक्ष्य असणार आहे.
रिषभ पंत(Rishabh Pant) आणि शुभमन गिलच्या(Shubhman Gill) शानदार खेळीच्या बळावर इंडियन टीमला या मॅचमध्ये विजय मिळवणं शक्य झालं. 328 रनचा पाठलाग करताना इंडियन टीमने रोहित शर्माला (Rohit Sharma) लवकर गमावले. पण त्यानंतर पुजारा आणि शुभमन गिल यांनी सावध खेळत टीमला चांगली सुरुवात दिली. यानंतर पुजाराने 56 रन करत विजयात मोलाची भूमिका बजावली.
या विजयासह टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये मागील 32 वर्षांपासून अजेय असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड मोडला आहे. या सीरिजमध्ये इंडियन टीमचे अर्ध्या डझनाहून अधिक प्लेयर जखमी झाले होते. पण तरुण तुर्कांनी शानदार कामगिरी करत टीमला ही मालिका जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. शुभमन गिल याने शानदार 91 रन केल्या. तसंच मिचेल स्टार्कच्या(Mitchell Starc) एकाच ओव्हरमध्ये 20 रन करत त्याची चांगलीच धुलाई केली. पुजारा आउट झाल्यानंतर रिषभ पंतने जबाबदारी घेत ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सची धुलाई करत नाबाद 89 रन केल्या आणि टीमला विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच इंडियन टीमने आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये देखील ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.