Home /News /sport /

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला पुन्हा मोठा धक्का, विराटनंतर आणखी एकाचा राजीनामा!

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला पुन्हा मोठा धक्का, विराटनंतर आणखी एकाचा राजीनामा!

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 टीमच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्याकडून वनडे टीमची कॅप्टन्सीही काढून घेण्यात आली. आता दक्षिण आफ्रिका दौरा (India tour of South Africa) सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 डिसेंबर : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 टीमच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर त्याच्याकडून वनडे टीमची कॅप्टन्सीही काढून घेण्यात आली, ज्यामुळे विराट कोहली नाराज झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. आता दक्षिण आफ्रिका दौरा (India tour of South Africa) सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयचे (BCCI) चीफ मेडिकल ऑफिसर (Chief Medical Officer) अभिजीत साळवी यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण पद सोडत असल्याचं साळवी म्हणाले. साळवी टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही गेले नाहीत, त्यामुळे चार्ल्स मिंज यांना या दौऱ्यासाठी डॉक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. साळवी यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने आता नव्या चीफ मेडिकल ऑफिसरचा शोध सुरू केला आहे. अभिजीत साळवी यांनी शनिवारी पीटीआय भाषाला मुलाखत दिली, यात त्यांनी आपला कार्यकाळ 30 नोव्हेंबरलाच संपला होता, असं सांगितलं. तरीही साळवी यांनी भारत-न्यूझीलंड यांच्यात 3-7 डिसेंबरमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टवेळीही टीम इंडियाला सेवा दिली. कोरोनाचा कठीण काळ, बायो-बबल आणि खेळाडूंची वारंवार होणारी कोरोना टेस्ट, यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली त्यांची भूमिका आणखी महत्त्वाची झाली होती. दक्षिण अफ्रीका के खिलाफ टेस्ट सीरीज से पहले बीसीसीआई के चीफ मेडिकल ऑफिसर (Chief Medical Officer) अभिजीत साल्वी ने इस्तीफा दे दिया है. (Abhijeet salvi twitter) 'मला ही संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार. या संघटनेसोबत 10 वर्ष राहिल्यानंतर मी पुढे जायचा निर्णय घेतला. कोरोनामुळे 24x7 सेवेसाठी उपलब्ध राहावं लागायचं, त्यामुळे स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ द्यायचा आहे,' असं साळवी म्हणाले. अभिजीत साळवी बीसीसीआयच्या आयु सत्यापन, डोपिंग रोधी विभाग आणि चिकित्सा विभागाचे प्रभारी होते. साळवी यांचा राजीनामा पुढच्या महिन्यात होणाऱ्या अंडर-16 राष्ट्रीय चॅम्पियनशीप (विजय मर्चंट ट्रॉफी) आधी आला आहे. साळवी यांना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यासह अन्य देशांचा टीम इंडियासोबत दौरा करावा लागा होता. आयपीएलचे दोन मोसम आणि टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये झाले तेव्हा त्यांनी चिकित्सा विभागाचीही देखरेख केली होती. भारतीय टीम टेस्ट आणि वनडे सीरिज खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेली आहे. टेस्ट सीरिजचा पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेन्च्युरियनमध्ये सुरू होणार आहे. दोन्ही देशांमध्ये पहिली वनडे 19 जानेवारीला होणार आहे. वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलेली नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india

    पुढील बातम्या