सिडने, 6 जानेवारी : इंडियन क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या (Ind vs Aus) दौऱ्यावर आहे. परंतु इंडियन टीम सध्या त्यांच्या कामगिरीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी इंडियन टीममधल्या खेळाडूंनी कोरोना प्रोटोकॉलचे(Bio Bubble) उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर नवीन वाद सुरू झाला होता. या पाचही खेळाडूंना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्यानं तर नियमांचे पालन करणार नसाल, तर परत जा अशी धमकीच भारतीय खेळाडूंना दिली. त्यात बीसीसीआयनंही चौथ्या कसोटीचे ठिकाण बदलण्याचा दबाव आणल्याची चर्चा आहे.
त्यानंतर आता विराट कोहली ( Virat Kohli) व हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनीही कोरोना नियम मोडल्याचा दावा केला जात आहे. भारतात रवाना होण्यापूर्वी या दोघांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलं होतं आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु यामध्ये आता नवीन माहिती समोर येत असून या दोघांनी भेट दिलेल्या दुकानाच्या मालकाने यासंदर्भात नवीन खुलासे केले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या बेबी स्टोअरच्या मालकाने कोहलीने आणि हार्दिक पांड्याने यावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळला आहे. माध्यमांमध्ये आलेलं वृत्त त्याने फ्रेटाळले असून आपल्या दुकानातील भेटीवेळी दोघांनीही सुरक्षित अंतर पाळल्याचे मालक नाथन पोंग्रास याने म्हटले. त्यामुळे आता नवीन खुलासा झाला असून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
या भेटीमध्ये दोघांनी विशेष काळजी घेत कर्मचाऱ्यांबरोबर फोटो काढताना सुरक्षित अंतर आणि कोणत्याही प्रकारचे हस्तांदोलन त्यांनी केलं नाही. त्याचबरोबर महिन्याच्या आठवड्यात सिडनीमध्ये मास्क वापरणं नसल्याचे देखील त्यांनी म्हटलं. काही जेष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला देखील या काळात मास्क वापरत नसल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी विराट व हार्दिक यांनी 7 डिसेंबरला एका बेबी शॉपमध्ये शॉपिंग केली आणि त्यावेळी त्यांनी मास्क घातले नव्हते. नियमानुसार दोन्ही खेळाडूंनी मास्क घालणे आवश्यक होते. विराट व हार्दिक यांनी त्या शॉपमधील कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले आणि त्यावेळीही त्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. असा आरोप केला होता. त्याचबरोबर 'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड' आणि 'द एज' या ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमातून पाहुण्या संघातील खेळाडू प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांना मास्क घालून बाहेर पडायला हवे होते, अशा बातम्या स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्या होत्या.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गेमिंग रूम, केस कापायची दुकाने आणि अनेक इनडोअर ठिकाणी मास्क बंधनकारक आहे. सिडनीमध्ये डिसेंबरच्या मध्यात कोरोनाचे संकट पुन्हा आल्याने 3 जानेवारी पासून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या दुकानातील भेटीविषयी बोलताना त्यांनी दोघंनी आमच्या दुकानाला आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या भेटीवेळी दोघांनीही अतिशय नम्रपणाने आमच्या कर्मचाऱ्यांबरोबर फोटो काढत त्यांना सहकार्य देखील केलं. त्यामुळं माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने हे प्रकरण रंगवले गेले ते दुर्दैवी असल्याचं देखील त्यांनी म्हटले. दरम्यान, इंडियन क्रिकेट टीम आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वजण निगेटिव्ह आढळले आहेत. उद्यापासून दोन्ही टीममध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.