वर्ल्ड कपआधी 'या' खेळाडूवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप, 21 दिवसांसाठी घातली बंदी

वर्ल्ड कपआधी 'या' खेळाडूवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप, 21 दिवसांसाठी घातली बंदी

या खेळाडूवर फक्त 21 दिवसांची बंदी का, चाहत्यांनी उपस्थित केला प्रश्न.

  • Share this:

लंडन, 27 एप्रिल : सध्या सगळीकडे वर्ल्ड कपच्या संघाची चुरस सुरु असताना, सर्व संघानी आपल्या 15 खेळाडूंची नावे जाहीर कली आहे. दरम्यान विश्वचषाकाआधी इंग्लंड संघाचा फलंदाज एलेक्स हेल्स यावर 21 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. हेल्सवर प्रतिबंध ड्रग्जचं सेवन करण्याचा आरोप आहे.

त्यामुळं हेल्स आता 21 दिवस क्रिकेट खेळू शकणार नाही.

हेल्स इंग्लंडच्या विश्वकप संघात सामिल असून, पाकिस्तान विरोधात होत असलेल्या मालिकेतही त्याचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी हेल्स क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची चर्चा होती. मात्र आता विनापरवानगी अंमली पदार्थांचं सेवन करत होता, असा आरोप आहे. हेल्स याआधी नॉटिंगमशायर संघाचा सदस्या असून, याआधीही हेल्स अनेक विवादांमुळं चर्चेत होता. याआधी त्यानं बेन स्टोक्सशी भर मैदानात राडा केला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, हेल्स हेअर फॉलिकल टेस्टमध्ये नापास झाला. ही टेस्ट इंग्लंडमध्ये मालिका सुरु होण्याआधी केली जाते. 2013 साली टॉम मेनॉर्डया खेळाडूचा मृत्यूनंतर ही टेस्ट सुरु करण्यात आली. हेल्स सध्या राखीव सलामी खेळाडू म्हणून संघात सामिल करण्यात आलं आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हेल्सचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यानं 69 एकदिवसीय सामन्यात 6 शतक लगावले आहेत, तर 2419 धावा केल्या आहेत.

हेल्सवर लगावण्यात आलेली बंदी, विश्वचषकाआधी उठवण्यात येणार आहे. त्यामुळं हेल्स 15 खेळाडूंच्या संघात सामिल होत असला तरी, त्याला 11 खेळाडूंच्या यादीत जागा मिळेल का, याबाबत शंका कायम आहे.

यावर इंग्लंडचे माजी क्रिकेटर मिशेल वॉन यांनी हेल्सला संघात स्थानच नाही दिले पाहिजे असे ट्विट केलं आहे.

ट्विटरवर हेल्सविरोधात ट्विट करण्यात आले आहेत. तसेच, चेंडू कुडतरल्या प्रकरणी वॉर्नरवर जर एक वर्षांची बंदी घातली होती. मग ड्रग्जचं सेवन करणाऱ्या खेळाडूवर केवळ 21 वर्षांची बंदी का? असा सवालही चाहते विचारत आहेत.

VIDEO : मोदींची मुंबईतील सभा, भाषण सुरू असतानाच अनेक लोक गेले निघून

First published: April 27, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या