१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात जेमिमाहचं द्विशतक

मुंबईच्या १६ वर्षांच्या जेमिमाह रोड्रिग्सनी द्विशतक झळकावलंय. १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात, सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात जेमिमाहनं ही कामगिरी केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2017 08:02 PM IST

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात जेमिमाहचं द्विशतक

05 नोव्हेंबर : मुंबईच्या १६ वर्षांच्या जेमिमाह रोड्रिग्सनी द्विशतक झळकावलंय. १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात, सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात

जेमिमाहनं ही कामगिरी केली. १६३ चेंडूत जेमिमाहनं २०२ रन्स केले.जेमिमाहच्या कामगिरीच्या जोरावर रावर मुबईनं ५० ओव्हरमध्ये ३४७ रन्स केले.

वन-डे लीगमध्ये १० सामन्यात जेमिमानं ७०० च्या वर रन्स केलेत. ३०० च्या अॅव्हरेजनी जेमिमाहने हे रन्स केलेत. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी रोड्रीग्स दुसरी महिला खेळाडू ठरलीये. या अगोदर स्मृती मानधनानी ही कामगिरी केलीये.

क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारी जेमिमाह हॉकीपट्टूही आहे. १७ वर्षाखालील हॉकी स्पर्धेत जेमिमाह खेळलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2017 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...