हैद्राबाद, 23 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून घरी परतल्यानंतर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याचं त्याच्या घरी जोरदार स्वागत झालं. सिराज आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर खूप आनंदी दिसत होता. मात्र त्याचवेळी वडिलांच्या आठवणीत त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. हैद्राबादला (Hyderabad) परतल्यानंतर पहिल्यांदा त्याने वडिलांच्या कब्रीवर नतमस्तक झाला. ( joy of winning the Test Series Mohammed Siraj gave himself a big gift )
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकण्याच्या आनंदात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने स्वत:साठी बीएमडब्ल्यू कार (BMW Car) खरेदी केली. सिराजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या नवीन लग्जरी कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनही लिहिलं आहे. 'अलहमदुलिल्लाह' याचा अर्थ सर्व स्तुती अल्लाहसाठी आहे, असा होतो.
हे ही वाचा-Sex Scandal!अधिकारी महिलेसोबत हॉटेल रुममध्ये सापडला एक प्रसिद्ध क्रिकेटर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) मोहम्मद सिराजने वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केला आणि ब्रिसबेन टेस्टच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने 5 विकेट घेतले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या अनुपस्थितत त्याने ङारतीय बॉलिंग अटॅकची जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आणि सीरिजमध्ये एकूण 13 विकेट घेतले.
Find of the tour for shoring up the bowling attack the way he did - Mohd Siraj. He fought through personal loss, racial remarks and channelised them to find home in the team huddle 🇮🇳 pic.twitter.com/qkzpXgqQiX
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 22, 2021
यावर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी ट्वीट करीत लिहिलं की, 'बॉलिंग अटॅकची जबाबदारी सिराजने अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली. तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो भारतासाठी एक शोध ठरला आहे. (( joy of winning the Test Series Mohammed Siraj gave himself a big gift )
) यादरम्यान सिराजने वडिलांना गमावलं, अपशब्दांचा सामना केला, मात्र यानंतरही त्याने चांगली कामगिरी केली.