मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup 2021 मध्ये बाबर आजमची बॅट तळपली, ठोकलं चौथे अर्धशतक

T20 World Cup 2021 मध्ये बाबर आजमची बॅट तळपली, ठोकलं चौथे अर्धशतक

Babar Azam

Babar Azam

टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये बाबर आजम (Babar Azam) चार अर्धशतकांसह सर्वाधिक धावा लगावणारा फलंदाज ठरला आहे.

दुबई, 8 नोव्हेंबर: यंदाच्यी टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 WorldCup) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची (Babar Azam) बॅट चांगलीच तळपली असल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत स्पर्धेत चौथे अर्धशतक झळकावले. काल, स्पर्धेतील, 41 वा सामना पाकिस्तान आणि स्कॉटलंड (PAK v SCO) यांच्यात खेळवण्यात आला. त्याने या सामन्यात 47 चेंडूत 66 धावांची तुफानी फलंदाजी केली.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने टी 20 वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा पन्नासहुन अधिक धावा केल्या आहेत. याआधी भारताविरुद्ध 68 धावा केल्यानंतर बाबर न्यूझीलंडविरुद्ध 9 धावा करुन बाद झाला होता. पण नंतर 51, 70 आणि आता 66 धावांची खेळी करत बाबरने अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आहे.

बाबर आजम चार अर्धशतकांसह टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये सर्वाधिक धावा लगावणारा फलंदाज झाला आहे. बाबरने 5 सामन्यात 66 च्या सरासरीने 264 धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरने बटलरला (240) मागे टाकले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या या खेळीमुळे तो एका वर्ल्ड रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

सलामीच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियात्या मॅथ्यू हेडनच्या नावावर आहे. त्याने 2007 च्या विश्वचषकात 265 धावा केल्या होत्या. त्यांनंतर विराट कोहलीने 2014 सालच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चार वेळा पन्नासहुन अधिक धावा केल्या होत्या.

काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानने निर्धारित 20 षटकात 189 धावा केल्या होत्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघ 117धाव करू शकला. कर्णधार बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी सामन्यात अर्धशतके झळकावली.

First published:

Tags: Babar azam, T20 cricket, T20 league, T20 world cup