Home /News /sport /

आर्थिक अडचणीत पाकने BCCI विरोधात खर्च केले 33 कोटी; पुन्हा एकदा Indian Team समोर पडले तोंडघशी

आर्थिक अडचणीत पाकने BCCI विरोधात खर्च केले 33 कोटी; पुन्हा एकदा Indian Team समोर पडले तोंडघशी

याबदल्यात पाकिस्तानला भारताकडून एक रुपयादेखील परत मिळाला नाही.

    इस्लामाबाद, 22 जानेवारी : आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात तोंडघशी पडल्यांनंतर एका खटल्यासाठी 33 कोटींहून अधिक खर्च केला आहे. याबदल्यात पाकिस्तानला भारताकडून एक रुपयादेखील परत मिळाला नाही. अधिकृत रेकॉर्डच्या खुलाशानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ उडाला आहे. सांगितलं जात आहे की, ही रक्कम पाकिस्तानातील सर्वश्रेष्ठ 192 खेळाडूंच्या गुणवत्तेच्या आधारानुसार स्टाइपेंडसाठी देण्यात आलेल्या पीसीबीच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा 100 टक्क्यांहून अधिक आहे. पाकिस्तानी संसदीय पॅनलने पीसीबीकडून मागितलं उत्तर पाकिस्तानातील एका संसदीय पॅनलने नुकताच पीसीबी म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितलं होतं. याशिवाय पीसीबीने कोणत्याही अधिकाऱ्याविरोधात कारवाई केली नाही. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांनी ही बाब स्वीकारली की, पाकिस्तान बीसीसीआयच्या विरोधात भरपाईचा दावा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. पाकिस्तानने केला होता दावा पाकिस्तानचा दावा आहे की, 2014 मध्ये भारतासोबत 6 क्रिकेट सीरीजबाबत करार झाला होता. ज्यानंतर भारताने दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता सीरिज रद्द केली होती. ज्यानंतर पाकने दावा केला होता की, पीसीबीने या तयारीसाठी 450 कोटी खर्च केले आहेत. याबाबत पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या विवाद निराकरण फोरमच्या समोर अपील केली होती. इम्रान खान यांनी पुन्हा घेतले 416 हजार कोटींचं कर्ज आर्थिक अडचणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकने आपली अर्थव्यवस्था चालविण्यासाठी पुन्हा एकदा 1.2 अब्ज डॉलर्स (, 87,56,58,00,000 रुपये) नवीन कर्ज घेतले आहे. कर्जाच्या या नव्या रकमेसह पाकिस्तानने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 5.7 अरब डॉलर्स (,,१,,०१,73,,50०,०००) इतकं कर्ज वाढविलं आहे. सऊदी आणि यूएईने पाककडून मागितलं कर्ज पंतप्रधान इम्रान खान अडीज वर्षे सरकार चालविल्यानंतर देशातील आर्थिक परिस्थितीसाठी गेल्या सरकारला जबाबदार असल्याचं सांगत आहे. पाकमध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही कशीबशी सोय केली जात आहे. दुसरीकडे पाकचे सर्वात मोठे दाता सऊदी अरब आणि यूएईने आपल्या कर्जाची रक्कम मागितली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या