Home /News /sport /

'...तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य'

'...तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य'

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

    मुंबई, 12 जुलै : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रशिक्षकपदाच्या या मुद्द्यावर भारताचा माजी ऑलराऊंडर रितेंदर सिंग सोदी (Ritender Singh Sodhi) याने प्रतिक्रिया दिली आहे. भारताने नोव्हेंबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकला तर रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणं अशक्य आहे, असं सोदी म्हणाला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ जर नोव्हेंबर महिन्यात संपला, तर शास्त्रींच्या पदाला हात लावला जाणार नाही, असं मतं सोदीने मांडलं. 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती, यानंतर टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. इंडिया न्यूजशी बोलताना सोदी म्हणाला, 'आयसीसी ट्रॉफी विजय पाहून प्रशिक्षक किती यशस्वी आहे, ते पाहणं योग्य नाही. रवीने चांगली कामगिरी केली नाही, असं बोलणं कठीण आहे. प्रशिक्षक म्हणून त्याने चांगलं काम केलं आहे. भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर त्याला प्रशिक्षकपदावरून काढणं अशक्य आहे.' रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारताचा 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. तर भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत दोन वेळा टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला, तेव्हा शास्त्रीच टीम इंडियाचे प्रशिक्षक होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Rahul dravid, Ravi shastri, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या