मुंबई, 01 फेब्रुवारी : इंटरनॅशनल लीग टी२०मध्ये मंगळवारी डेझर्ट वायपर्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात डेझर्ट वायपर्सने २२ धावांनी विजय मिळवला. यावेळी सॅम बिलिंग्सने दाखवलेल्या चपळाईचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिलिंग्सने उजव्या बाजूला उडालेला चेंडू अडवत मागेही न पाहता थेट थ्रो मारला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाला बाद केलं.
इंग्लंडच्या बर्मी आर्मीने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. शारजाह वॉरिअर्सचा कर्णधार जो डेनलीने चेंडू डिफेंड केला. बॅटला लागून चेंडू थोडा मागे गेला तर डेनली क्रीजमधून थोडासा पुढे आला होता. याचा फायदा घेत सॅम बिलिंग्जने चेंडू थेट स्टम्पवर थ्रो केला. सॅम बिलिंग्जने फक्त तीन सेकंदात चपळाई दाखवत वेगाने हालचाली केल्या. चेंडू हातात येताच तो न पाहता स्टम्पच्या दिशेने फेकला. डेनली पाच चेंडूवर १ धावा काढून बाद झाला.
Sam Billings that is ridiculous 😍
pic.twitter.com/vqWH5CbjLP — England's Barmy Army (@TheBarmyArmy) February 1, 2023
हेही वाचा : शुभमन गिलची गाडी सुसाट! शतक झळकावताच झाले अनेक विक्रम
धोनीने असा थ्रो रांचीत न्यूझीलंडविरुद्ध खेळताना केला होता. धोनी विकेटपासून थोडा दूर होता पण सीमारेषेवरून फेकलेला थ्रो न पाहता हातानेच स्टम्पवर मारला होता. सॅमच्या या थ्रोमुळे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक धोनीने केलेल्या थ्रोची आठवणही चाहत्यांना झाली.
सामन्यात डेझर्ट वायपर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वायपर्सच्या संघाने २० षटकात १४८ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल खेळताना शारजाहच्या संघाला फक्त १२६ धावाच करता आल्या. सॅम बिलिंग्जने २३ चेंडूत २७ धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket