मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पीटी उषाच्या अकादमीवर अतिक्रमण, भावुक होत म्हणाली, खासदार झाल्यापासून केलं जातंय टार्गेट

पीटी उषाच्या अकादमीवर अतिक्रमण, भावुक होत म्हणाली, खासदार झाल्यापासून केलं जातंय टार्गेट

पत्रकार परिषदेत भावुक होत पीटी उषा यांनी म्हटलं की, हा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. असंच कुणी कसं परवानगीशिवाय विद्यार्थीनींच्या कँपसमध्ये घुसू शकतं.

पत्रकार परिषदेत भावुक होत पीटी उषा यांनी म्हटलं की, हा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. असंच कुणी कसं परवानगीशिवाय विद्यार्थीनींच्या कँपसमध्ये घुसू शकतं.

पत्रकार परिषदेत भावुक होत पीटी उषा यांनी म्हटलं की, हा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. असंच कुणी कसं परवानगीशिवाय विद्यार्थीनींच्या कँपसमध्ये घुसू शकतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

दिल्ली, 04 फेब्रुवारी : केरळच्या कोझिकोडमध्ये असलेल्या उषा स्कूल ऑफ एथलेटिक्सच्या जमिनीवर काही जणांकडून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारताची धावपटू आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पीटी उषा यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भावुक होत पीटी उषा यांनी म्हटलं की, हा मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. असंच कुणी कसं परवानगीशिवाय विद्यार्थीनींच्या कँपसमध्ये घुसू शकतं.

अवैध बांधकामाची पानागढ पंचायतीला माहिती आहे. तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींसह इतर एथलिट्सना सुरक्षित वातावरण मिळायला हवं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. मी राज्यसभा खासदार झाल्यानंतर अकादमीला टार्गेट केलं जात असून माझ्यावर वैयक्तिक हल्ले होत आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे असंही पीटी उषाने म्हटलं.

हेही वाचा : भारताच्या महिला जिम्नॅस्टपटूवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी कारवाई

पीटी उषाला 6 जुलै 2022 मध्ये राज्यसभा खासदार करण्यात आलं. केंद्रातील भाजप सरकारने राज्यसभेत पीटी उषाच्या खासदारकीसाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे शिफारस केली होती. सध्या पीटी उषा या भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष आहेत. आयओएच्या त्या पहिल्याच महिला अध्यक्ष आहेत. 1984 मध्ये लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्या 400 मीटर हर्डल रेसमध्ये चौथ्या क्रमांकावर होत्या. सेकंदाच्या शंभराव्या भागाने त्यांच कांस्य पदक हुकलं होतं. तर ट्रॅक एंड फिल्डमध्ये त्यांचे नाव आशियातील सर्वोच्च महिला एथलिटमध्ये घेतले जाते.

First published:

Tags: Kerala