S M L
Football World Cup 2018

कुस्ती टिकवायची असेल तर बदल स्विकारले पाहिजे -शरद पवार

जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणारे कुस्तीगीर या स्पर्धेतून तयार होतील अशी आशाही यावेळी पवारांनी व्यक्त केली

Sachin Salve | Updated On: Jan 12, 2018 10:26 PM IST

कुस्ती टिकवायची असेल तर बदल स्विकारले पाहिजे -शरद पवार

12 जानेवारी : कुस्ती टिकवायची असेल तर तिच्यात होणारे बदल आपण स्विकारायला हवेत असं मत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. झी टॉकिजच्या महाराष्ट्र कुस्ती लीगची घोषणा करताना ते बोलत होते.

जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणारे कुस्तीगीर या स्पर्धेतून तयार होतील अशी आशाही यावेळी पवारांनी व्यक्त केली.  कुस्ती म्हणजे मातीतला रांगडा खेळ.. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलीये.

या कुस्तीला वेगळं वैभव प्राप्त व्हावा यासाठी हा कुस्तीचा खेळ वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार आहे.

9 मार्च ते 15 मार्च दरम्यान ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे. 'ताकदीची कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती' असं या कुस्ती लीगचं घोषवाक्य असणार आहे. कुस्ती लिगच्या लोगोचं अनावरणही यावेळी करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 10:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close