भारताच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीवर आरोप, ‘मनमानी थांबवून निवृत्तीवर विचार करावा’

भारताच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीवर आरोप, ‘मनमानी थांबवून निवृत्तीवर विचार करावा’

भारताच्या माजी क्रिकेटपटूनं धोनीवर केली जहरी टीका.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं दोन महिने क्रिकेटपासून दूर आहे. धोनीनं वर्ल्ड कपनंतर एकही सामना खेळलेला नाही आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या मालिकेत धोनीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. धोनी सध्या विश्रांती घेत आहे, त्यामुळं धोनी संघाचा वेळ घालवत आहे, अशी टीका त्याच्यावर होत आहे.

वर्ल्ड कप संपल्यानंतर खर तर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत होत्या 38 वर्षीय धोनी निवृत्तीची घोषणा करणार असे वाटत असताना धोनीनं लष्करात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धोनीनं महिनाभर काश्मीरमध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 15 दिवस धोनीनं लष्करासोबत कामही केले. त्यामुळं वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनीला जाता आले नाही. दरम्यान आता धोनीच्या पुनरागमनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धोनीनं आपल्या सुट्टीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळं धोनी नोव्हेंबरपर्यंत कोणताही सामना खेळणार नाही आहे.

वाचा-एक झलक पाहण्यासाठी आलेल्या चाहत्याचा अपघात, मदतीसाठी धावून आला पांडया

याबाबत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं धोनीवर निशाणा साधत, मनमानी बंद करत निवड समितीनं त्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गंभीरनं, “निवृत्तीचा निर्णय हा प्रत्येक खेळाड़ूचा असतो. निवड समितीनं धोनीशी चर्चा केली पाहिजे आणि त्याची नेमकी रणनीती काय आहे, हे विचारावे. जर तुम्ही देशासाठी खेळत आहात तर, कोणती मालिका खेळावी हा निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत”, असे मत व्यक्त केले.

आता थेट पुढच्या वर्षी धोनी करणार पुनरागमन?

धोनीनं क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ धोनी दोन दिवसांत सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही खेळू शकणार नाही आहे. नोव्हेंबरपर्यंत क्रिकेट खेळणार नसल्यामुळं धोनी आता थेट पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे, त्यावेळी पुनरागमन करू शकतो. तसेही झाले नाही तर चाहत्यांना झिम्बाम्वे आणि ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वाचा-मी काय तबला वाजवण्यासाठी आहे का? टीकाकारांवर रवी शास्त्री भडकले

वर्ल्ड कपमध्ये खेळणार का धोनी

धोनीनं अखेरचा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळला होता. त्यानंतर धोनीनं एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विचार केल्यास धोनीची जागा ऋषभ पंत घेऊ शकतो. पण पंतची खेळी पाहता, टीम इंडियाला धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासेल.

गावसकर यांनीही धोनीवर केली होती टीका

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी धोनीची वेळ आता संपली आहे असं म्हटलं आहे. त्याच्या निवृत्तीची वेळ आली असून पुढचा विचार करणं गरजेचं आहे असं गावस्कर यांनी म्हटलं. सुनिल गावस्कर यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटलं की, मी आदरपूर्वक सांगतो की धोनीचा वेळ संपला आहे. भारताने आता पुढचा विचार करायला हवा. संघातून बाहेर काढण्यापूर्वी त्याला शेवटचा सामना खेळण्याची संधी द्यायला हवी.

वाचा-प्लीज मला ओपनिंगला पाठवा, सचिननं सांगितली 25 वर्षांपूर्वीची UNTOLD STORY

VIDEO : होत्याचं नव्हतं झालं, गोठ्यातील गायी-म्हशींचा हकनाक मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dhoni
First Published: Sep 27, 2019 10:35 AM IST

ताज्या बातम्या