मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'आता वेळ मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची..', कपिल देव यांचा टीम मॅनेजमेंटला सल्ला

'आता वेळ मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची..', कपिल देव यांचा टीम मॅनेजमेंटला सल्ला

kapil dev

kapil dev

भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यापूर्वी, कपिल देव (Kapil Dev) यांनी बीसीसीआयला(BCCI) मोलाचा सल्ला दिला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात बुधवारी टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचा (T20 World Cup 2021) 33 वा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी संघ व्यवस्थापनाला मोलाचा सल्ला दिला आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा पाकिस्तान विरुद्ध 10 विकेट्सनं तर न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सनं पराभव झाला आहे. सलग दोन पराभवामुळे सेमी फायनल गाठण्याची टीम इंडियाची आशा आता जर-तरमध्ये अडकली आहे. स्कॉटलंडनं न्यूझीलंडला हरवण्याचा चमत्कार केला तर टीम इंडियाचं सेमी फायनलच्या रेसमध्ये पुनरागमन होणार आहे.

टीम इंडियाच्या याच बिकट अवस्थेवर कपिल देव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाष्य केले आहे. ते म्हणाले, जर आम्ही काही इतर संघांच्या जोरावर यशस्वी झालो तर ती कौतुकास्पद गोष्ट नाही. तुम्हाला वर्ल्ड कप जिंकायचा असेल किंवा सेमीफायनल गाठायची असेल, तर तुम्हाला ते स्वबळावर लढावे लागेल. इतर संघांवर अवलंबून न राहणे चांगलेच. त्यामुळे मला वाटते की, आता निवडकर्त्यांनी मोठी नावे आणि मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवायचे आहे.

आयपीएलमध्ये चांगले खेळणाऱ्यांना संधी मिळाली पाहिजे

सध्याच्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या खराब कामगिरीमागे अनेक कारणे असू शकतात. बायो-बबल, सततच्या क्रिकेटमुळे येणारा थकवा आणि संघ निवड ही तीन प्रमुख कारणे असू शकतात. तसे असेल तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे आणि तंदुरुस्त असलेले अनेक युवा खेळाडू आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. असे मत यावेळी कपिल देव यांनी व्यक्त केले होते.

तसेच ते पुढे म्हणाले, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी देण्याची वेळ का आली आहे ? याचा विचार बीसीसीआयने करण्याची गरज आहे. आपण पुढची पिढी कशी चांगली बनवू शकतो? हे पाहणे आता योग्या ठरेल. ते हरले तर त्यात काही गैर नाही. कारण त्यांना अनुभव मिळेल. अनुभवी खेळाडूंनी खराब परफॉर्म दाखवला तर त्यांच्यावर बोचरी टीका होईल. त्यामुळे मला वाटते की बीसीसीआयने हस्तक्षेप करून अधिक तरुणांना संघात घेण्याचा विचार केला पाहिजे. असे ठाम मत कपिल देव यांनी यावेळी व्यक्त केले.

First published:

Tags: T20 league, T20 world cup, Team india