Home /News /sport /

इम्रान खान यांची 'कॅप्टनसी' जाताच पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे, अध्यक्ष देणार राजीनामा!

इम्रान खान यांची 'कॅप्टनसी' जाताच पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदलाचे वारे, अध्यक्ष देणार राजीनामा!

पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय घडामोडीनंतर इम्रान खान (Imran Khan) यांचे पंतप्रधानपद गेले आहे. देशातील सत्ताबदलाचे वारे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डातही (PCB) वाहू लागले आहेत.

    मुंबई,  11 एप्रिल : पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय घडामोडीनंतर इम्रान खान (Imran Khan) यांचे पंतप्रधानपद गेले आहे. देशातील सत्ताबदलाचे वारे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डातही (PCB) वाहू लागले आहेत. पीसीबी अध्यक्ष रमिझ राजा (Ramiz Raja) देखील लवकरच राजीनामा देतील अशी माहिती पाकिस्तानच्या मीडियानं दिली आहे. राजा आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईमध्ये गेले होते. ही बैठक रविवारी समाप्त झाली. इम्रान खान यांच्या आग्रहामुळेच राजा पीसीबीचे अध्यक्ष झाले होते. पीसीबी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी टीव्ही कॉमेंटेटर आणि क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून मिळणाऱ्या पैशांवर पाणी सोडावं लागलं होतं. इम्रान खान पंतप्रधान असेपर्यंतच आपण पीसीबी अध्यक्ष राहू असं राजा यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. आता इम्रान खान यांचेच पंतप्रधानपद गेल्यानं राजा यांची खूर्ची धोक्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधानच पीसीबीचे संरक्षक आहेत. तेच पीसीबी अध्यक्षांची नियुक्ती करतात. त्यामुळे नवे पंतप्रधानाच्या कार्यकाळात राजा अध्यक्षपदी राहण्याची कोणतीही शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजा यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पीसीबीचे अध्यक्षपद स्विकारले होते. त्यांनी अध्यक्षपदी येताच 6 फर्स्ट क्लास टीमच्या आधारावर देशांतर्गत क्रिकेट मजबूत करण्यावर भर दिला होता. त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट टीमचा हेड कोच मिसबाह उल हक आणि बॉलिंग कोच वकार युनूसचीही त्यांनी हकालपट्टी केली होती. IPL 2022, SRH vs GT : अपराजित गुजरातच्या टीममध्ये हार्दिक करणार बदल, पाहा कशी असेल Playing11 नजम सेठी अध्यक्ष होणार? पाकिस्तानमधील मीडियाच्या वृत्तानुसार शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यानंतर नजम सेठी पीसीबीचे अध्यक्ष होऊ शकतात. ते यापूर्वी देखील पीसीबीचे अध्यक्ष होते. इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याशी राजकीय मतभेद असल्यानं सेठी यांनी राजीनामा दिला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Imran khan, Pakistan Cricket Board

    पुढील बातम्या