मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

न्यूझीलंडच्या टीम साऊदीची ऐतिहासिक कामगिरी, हा विश्वविक्रम करणारा जगातला पहिलाच खेळाडू

न्यूझीलंडच्या टीम साऊदीची ऐतिहासिक कामगिरी, हा विश्वविक्रम करणारा जगातला पहिलाच खेळाडू

टीम इंडियाचे (Team India) फॅन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test)  मिळवलेल्या विजयाचा सध्या जल्लोष करत आहेत. त्याचवेळी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK)  यांच्यातील टेस्टमध्ये एक खास रेकॉर्ड झाला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 30 डिसेंबर : टीम इंडियाचे (Team India) फॅन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Day Test)   मिळवलेल्या विजयाचा सध्या जल्लोष करत आहेत. त्याचवेळी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK)  मॅचमध्ये एक खास रेकॉर्ड झाला. न्यूझीलंडचा फास्ट बॉल टीम साऊदीनं (Tim Southee) टेस्ट क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये 300 विकेट्स हा काही रेकॉर्ड नाही. यापूर्वी अनेक बॉलर्सनी ही कामगिरी केली आहे. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये 300 विकेट्स आणि 70 पेक्षा जास्त सिक्सर्स लगावणारा साऊदी हा क्रिकेट विश्वातील एकमेव खेळाडू आहे. न्यूझीलंडमधील 'बॉक्सिंग डे' (Boxing Day) टेस्टमध्येच त्यानं हा रेकॉर्ड केला आहे. न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 101 रन्सनं पराभव करुन ही टेस्ट जिंकली आहे. लक्षात न येणारा साऊदी! क्रिकेट विश्वातील ऑल राऊंडरचा विषय निघाल्यानंतर कपिल देव, इयान बोथम, इम्रान खान, गॅरी सोबर्स, रिचर्ड हॅडली, जॅक कॅलीस, शेन वॉटसन, सनथ जयसूर्या आणि बेन स्टोक्स यांची नाव आठवतात. या यादीत साऊदीची नाव कुणी घेत नाही, पण साऊदीचा खेळ हा या ‘ऑल राऊंडर्स’पेक्षा कमी नाही. साऊदीनं एकूण 76 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 300 विकेट्स घेतल्या असून 1690 रन्स केले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त चार ऑल राऊंडर्सनी साऊदीपेक्षा जास्त सिक्सर लगावे आहेत. जॅक कॅलीस (Jacques Kallis) ख्रिस केन्स (Chris Cairns), एंड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी साऊदीपेक्षा जास्त सिक्सर्स लगावले आहेत. मात्र हे सर्व विकेट्स घेण्याच्या यादीमध्ये साऊदीपेक्षा मागं आहेत. आक्रमक साऊदी! 32 वर्षांच्या साऊदीचा रेकॉर्ड पाहिला तर तो उत्तम बॉलर्ससह लोअर ऑर्डरमधला उपयुक्त बॅट्समन आहे. त्याने 26 टक्के रन हे सिक्सरच्या मदतीनं बनवले आहेत. क्रिकेट विश्वात अशा प्रकारचा खेळ करणारे खूप कमी बॅट्समन आहेत. या आक्रमक बॅट्समन्सच्या यादीमध्येही साऊदीचं नाव कधी घेतलं जात नाही.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या