World Cup: शमीला धोनीचा मोलाचा सल्ला, हॅट्ट्रिकसह मिळवून दिला विजय! icc cricket world cup 2019 | india vs afghanistan | ms dhoni | cricket

World Cup: शमीला धोनीचा मोलाचा सल्ला, हॅट्ट्रिकसह मिळवून दिला विजय! icc cricket world cup 2019 | india vs afghanistan | ms dhoni | cricket

ICC Cricket World Cup 2019 : भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने संधीचे सोने करत हॅट्ट्रिक केली.

  • Share this:

साऊदम्पटन, 22 जून : ICC Cricket World Cup भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना इतका चुरशीचा होईल असे कोणालाच वाटले नव्हते. कमी धावसंख्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी बाजी लावली. भारताने प्रथम फलंदाजी करत 8 विकेटच्या बदल्यात 224 धावा केल्या. त्याला उत्तर देताना अफगाणिस्तानने अखेरच्या षटकापर्यंत लढा दिला. पण अखेर भारताने 11 धावांनी विजय मिळवला. भारताकडून जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अचूक गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. त्यामुळे सामना भारताच्या बाजूने झुकला. या दोन्ही खेळाडूंनी हे सिद्ध करुन दाखवले की ते जगातील सर्वोत्तम आक्रमक गोलंदाज आहेत. या सामन्यात शमीने घेतलेल्या हॅट्ट्रिकची चर्चा झाली. पण त्याशिवाय आणखी एक घटना आहे ज्याची सर्वजण चर्चा करत आहेत.

VIDEO: भारताची वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक; चेतन शर्माने केली होती कमाल!

अखेरच्या षटकात जेव्हा सामना अत्यंत चुरशीचा झाला होता. तेव्हा महेंद्र सिंग धोनी अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. धोनी सातत्याने शमी आणि बुमराह यांच्याशी बोलत होता. त्यांनी कोणत्या ठिकाणी आणि कशी गोलंदाजी करायची यासंदर्भात धोनी त्यांच्याशी बोलत होतो. जेव्हा बुमराह 49 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला तेव्हा बराच वेळ धोनी त्याच्याशी बोल होतो. अखेरच्या काळात क्षेत्ररक्षणाची जबाबदारी धोनीकडेच होती. तेव्हा कर्णधार विराट कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. अशा प्रकारच्या अटीतटीच्या सामन्यातील अनुभवामुळे गोलंदाजी आणि अन्य सर्व जबाबदारी धोनीकडे असल्याचे दिसून आले.

India's captain Virat Kohli, left, celebrates their win as he leaves the field with teammates at the end of the Cricket World Cup match between India and Afghanistan at the Hampshire Bowl in Southampton, England, Saturday, June 22, 2019. (AP Photo/Aijaz Rahi)

जेव्हा शमी अखेरच्या षटकात गोलंदाजीसाठी आला तेव्हा देखील धोनी त्याच्याशी बराच वेळ बोलत होता. 50 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबीने शमीला चौकार मारला तेव्हा धोनी धावत त्याच्याकडे आला आणि शमी यॉर्कर लेंथवर चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. यानंतर शमीने फक्त बचाव केला नाही तर वर्ल्डमध्ये हॅट्ट्रिकही नोंदवली करता आली. वर्ल्डकप इतिहासात भारताकडून हॅट्ट्रिक करणारा शमी दुसरा गोलंदाज ठरला आहे.धोनीच्या सल्ल्यानंतर पुढील सर्व चेंडू यॉर्कर टाकले असं शमीने सामन्यानंतर सांगितले. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 10 गोलंदाजांना हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी करता आली आहे. वर्ल्डकपमधील पहिली हॅट्ट्रिक भारताच्या चेतन शर्मा यांनी 1987च्या वर्ल्डकपमध्ये केली होती.

SPECIAL REPORT: पाकिस्तानच्या कर्णधाराची चाहत्यांकडून खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या