Elec-widget

झिम्बाम्बेला क्रिकेट खेळता येणार नाही, ICC ने 'या' कारणामुळे केली कारवाई!

झिम्बाम्बेला क्रिकेट खेळता येणार नाही, ICC ने 'या' कारणामुळे केली कारवाई!

आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली असून यामुळे त्यांना आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

  • Share this:

लंडन, 19 जुलै : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. लंडन मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने याबाबत अधिकृतपण गुरुवारी जाहीर केले आहे. आय़सीसीने सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला. याबाबत झिम्बाब्वे क्रिकेटला इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही सरकारी हस्तक्षेप कमी करण्यात झिम्बाब्वे क्रिकेट अपयशी ठरल्याने अखेर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली.

झिम्बाब्वे सरकारने तिथल्या क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी आयसीसीने हा निर्णय घेतला त्यावेळी झिम्बाब्वेची आय़र्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होती. झिम्बाब्वेशिवाय क्रोएशिया क्रिकेट फेडरेशनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी सांगितलं की, कोणत्याही सदस्याला निलंबित करण्याचा निर्णय आम्ही सहजच घेत नाही. मात्र, खेळात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. झिम्बाब्वेत जे काही झालं ते आयसीसीच्या नियमाला धरून नव्हतं. त्याकडे आयसीसी दुर्लक्ष करू शकत नाही. आयसीसीला वाटतं की झिम्बाब्वेमध्ये आयसीसीच्या नियमानुसार क्रिकेट सुरू रहावं.

निलंबनानंतर झिम्बाब्वे क्रिकेटला आयसीसी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नाही. तसेच झिम्बाब्वेच्या संघाला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. यामुळे झिम्बाब्वेला पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायरमध्ये खेळण्याचा आशा मावळल्या आहेत.

Loading...

क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!

जानेवारी 2020 मध्ये झिम्बाब्वेची भारतासोबत टी20 मालिका होणार होती. मात्र, निलंबनामुळे द्विपक्षीय मालिकाही धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून झिम्बाब्वे क्रिकेटचा खेळ खालावला असून त्यांच्या कसोटी संघाचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 08:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...