ICC च्या एका निर्णयानं 30 खेळाडूंचं करिअर उद्ध्वस्त!

आयसीसीने घेतलेल्या त्या निर्णयानं पुढच्या वर्षी होणाऱ्या भारताविरुद्धच्या टी 20 मालिकाही धोक्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 01:21 PM IST

ICC च्या एका निर्णयानं 30 खेळाडूंचं करिअर उद्ध्वस्त!

लंडन, 19 जुलै : आयसीसीनं झिम्बाम्बे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लंडन मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने याबाबतची माहिती गुरुवारी जाहीर केले आहे. आय़सीसीने सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेतला आहे. सरकारी हस्तक्षेपामुळे हा निर्णय घेण्यात आला. याबाबत झिम्बाब्वे क्रिकेटला इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही सरकारी हस्तक्षेप कमी करण्यात झिम्बाब्वे क्रिकेट अपयशी ठरल्याने अखेर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली.

झिम्बाब्वे सरकारने तिथल्या क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी आयसीसीने हा निर्णय घेतला त्यावेळी झिम्बाब्वेची आय़र्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होती. झिम्बाब्वेशिवाय क्रोएशिया क्रिकेट फेडरेशनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आयसीसीच्या या निर्णयामुळे झिम्बाम्बेच्या क्रिकेटपटूमध्ये मात्र निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू सिकंदर रजाने म्हटलं की, या एका निर्णयानं अनेक लोकांना बेरोजगार केलं आहे. यष्टीरक्षक ब्रेंडन टेलरनेसुद्धा आयसीसीच्या निर्णयावर दु:ख व्यक्त केलं आहे.

झिम्बाम्बे क्रिकेट बोर्डाला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानं देशाच्या क्रिकेटवर पडला आहे. यात 30 खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर अनेक प्रश्न उभा राहिले आहेत. झिम्बाम्बेच्या या 30 खेळाडूंची कारकिर्द पणाला लागली आहे. या निर्णयानं सर्व खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे.

Loading...

निलंबनानंतर झिम्बाब्वे क्रिकेटला आयसीसी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नाही. तसेच झिम्बाब्वेच्या संघाला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. यामुळे झिम्बाब्वेला पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपच्या क्वालिफायरमध्ये खेळण्याचा आशा मावळल्या आहेत.जानेवारी 2020 मध्ये झिम्बाब्वेची भारतासोबत टी20 मालिका होणार होती. मात्र, निलंबनामुळे द्विपक्षीय मालिकाही धोक्यात आली आहे.

आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी सांगितलं की, कोणत्याही सदस्याला निलंबित करण्याचा निर्णय आम्ही सहजच घेत नाही. मात्र, खेळात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. झिम्बाब्वेत जे काही झालं ते आयसीसीच्या नियमाला धरून नव्हतं. त्याकडे आयसीसी दुर्लक्ष करू शकत नाही. आयसीसीला वाटतं की झिम्बाब्वेमध्ये आयसीसीच्या नियमानुसार क्रिकेट सुरू रहावं.

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्याचा न्यूझीलंड करणार सन्मान!

मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

VIDEO: अजित पवार म्हणाले, रामदास आठवलेंसारखं जमायला लागलं बुवा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...