वर्ल्ड कपची चूक Test Championship मध्ये सुधारणार, सामना टाय झाल्यास असा ठरणार विजेता

वर्ल्ड कपची चूक Test Championship मध्ये सुधारणार, सामना टाय झाल्यास असा ठरणार विजेता

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात आयसीसीच्या अनेक नियमांवरून वाद निर्माण झाला होता.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच कसोटीमध्येही वर्ल्ड कप म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामध्ये आयसीसी क्रमवारीत पहिल्या नऊ संघांना सहभागी होता येणार आहे. कसोटीचा हा वर्ल्ड कप दोन वर्ष चालणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात आयसीसीच्या अनेक नियमांवरून वाद निर्माण झाला आहे. यात ओव्हर थ्रो, सुपर ओव्हरचे नियम वादग्रस्त ठरले होते. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना होणार आहे.

2021 पर्यंत चालणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये 27 कसोटी मालिकांमध्ये मिळून 71 सामने होणार आहेत. चॅम्पियनशिपच्या अखेरच्या टप्प्यात ज्या दोन संघांचे गुण सर्वाधिक असतील त्यांचा जून 2021 मध्ये अंतिम सामना होईल.

आयसीसीच्या या चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामना ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. वनडे प्रमाणे यासाठीसुद्धा राखीव दिवस असेल. जर पाच दिवसांत काही षटकांचा खेळ झाला तरी तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. एका दिवसात 6 तासांचा खेळ होणं अपेक्षित आहे. यानुसार 5 दिवसांत 30 तासांचा खेळ होईल. जर पावसाने दोन तास खेळ झाला नाही तर राखीव दिवशी उर्वरित सामना पूर्ण करण्यात येईल.

एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि जर्सी नंबर असणार आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा वापर केला जात होता.

IND vs WI : वाद सोडा, वेस्ट इंडिजमध्ये विराट मोडणार धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंचे मोठे रेकॉर्ड!

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यात 2 कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. या मालिकेसोबत भारताचे टेस्ट चॅम्पियनशीप अभियान सुरू होणार आहे. त्यामुळं वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या विराट सेनेला कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे.

आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही.

IND vs WI : आता रोहित-विराटची मैदानावर होणार टक्कर, कोण होणार टी-20चा बादशाह!

VIDEO: 'फक्त 4 नाही तब्बल 50 आमदार भाजपच्या पाईपलाईनमध्ये'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 30, 2019 02:49 PM IST

ताज्या बातम्या