मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भारताने दक्षिण आफ्रिकेला चिरडलं! WTC Points Table मध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?

भारताने दक्षिण आफ्रिकेला चिरडलं! WTC Points Table मध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?

Photo-BCCI

Photo-BCCI

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs South Africa 1st Test) 113 रनने दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC Points Table) एकूण पॉईंट्स 54 आणि परसेंटेज पॉईंट्स 64.28 टक्के झाले आहेत.

पुढे वाचा ...

सेंच्युरियन, 30 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs South Africa 1st Test) 113 रनने दणदणीत विजय मिळवला. याचसह टीम इंडियाने तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. या विजयासोबतच टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC Points Table) एकूण पॉईंट्स 54 आणि परसेंटेज पॉईंट्स 64.28 टक्के झाले आहेत. असं असलं तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम पाकिस्ताननंतर चौथ्या क्रमांकावर आहे, कारण भारताचे परसेंटेज पॉईंट्स पाकिस्तानपेक्षा कमी आहेत.

ऍशेस सीरिजच्या (Ashes Series) तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा इनिंगच्या फरकाने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने (Australia vs England) आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. 36 पॉईंट्सह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 24 पॉईंट्ससह दुसऱ्या आणि पाकिस्तान 36 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला 2019 ऍशेस सीरिजपासून सुरुवात झाली होती. जून 2021 मध्ये न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताचा पराभव करत पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली होती. यानंतर दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या टेस्ट सीरिजपासून सुरुवात झाली. या सीरिजमध्ये भारताने 2-1 ने आघाडी घेतली.

First published:

Tags: South africa, Team india, WTC ranking