ICC World Test Championship Point Table : कसोटीच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा धमाका, पाहा कोण कितव्या स्थानी

भारतानं विडीजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली असून विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार झाला आहे.

  • Share this:

विंडीजविरुद्धची दोन कसोटीस सामन्यांची मालिका जिंकून भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी सुरुवात केली. या मालिका विजयासह चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात 120 गुणांसह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे.

भारतानंतर दुसऱ्या स्थानावर न्यूझील़ंड आहे. लंकेविरुद्ध कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा एक विजय आणि एक पराभव झाला आहे. या दोन्हींचे प्रत्येकी 60 गुण झाले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अॅशेस मालिकेपासून सुरुवात झाली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला तर एक अनिर्णित राहिला. यामुळे दोन्ही संघांचे प्रत्येकी 32 गुण झाले आहेत.

आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाहीत. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या