ICC World Test Championship Point Table : टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

सध्या गुणतालिकेत यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 07:16 PM IST

ICC World Test Championship Point Table : टेस्ट क्रिकेटच्या 'वर्ल्ड कप'मध्ये टीम इंडिया सुसाट, पाहा कोण कितव्या स्थानी

मुंबई, 26 ऑगस्ट : आयसीसीच्या वतीनं कसोटी क्रिकेटला वाव मिळावा यासाठी अशेस मालिकेपासून टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. 2021पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे, या स्पर्धेअंती ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ 2021मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिले टेस्ट वर्ल्ड कप विजेतेपद मिळवेल. दरम्यान सध्या गुणतालिकेत यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेची दमदार खेळी यांना या विजयाचे श्रेय जाते. दरम्यान या कसोटी विजयामुळं टेस्ट चॅम्पिनयशिपमध्ये भारतीय संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

विंडीजविरुद्धची पहिली कसोटी भारताने चौथ्या दिवशी 318 धावांनी जिंकली. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं शतक करून भारताला मोठी आघाड़ी मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 100 धावांत गुंडाळलं. बुमराहनं अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. त्याशिवाय पहिल्या डावात 5 विकेट घेणाऱ्या इशांत शर्मानं 31 धावा देत 3 गडी बाद केले. मोहम्मद शमीनं 2 गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात रहाणेनं 102 धावांची तर हनुमा विहारीनं 93 धावांची खेळी केली. पहिल्या डावात भारताने 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर विंडीजला 222 धावांपर्यंत मजल मारता आली होती.

वाचा-इंग्लंडच्या खेळाडूंना चडली विजयाची नशा, भर मैदानातच झाली बिअर पार्टी!

Loading...

गुणतालिकेत सध्या टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्या खात्यातील गुणांची संख्या समसमान आहे. पण, भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया व इंग्लंड प्रत्येकी 32 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही. सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 20-20 गुण, तर बरोबरीत सुटल्यास प्रत्येकी 30-30 गुण दिले जातील. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयी संघाला 40 गुण मिळतील. अनिर्णित व बरोबरीच्या निकालांसाठी दोन्ही संघांना प्रत्येकी अनुक्रमे 13.3 व 20 गुण दिले जातील. 4 सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 30 गुण घेईल, तर अनिर्णित निकालासाठी 10 व बरोबरीच्या निकालासाठी 15 गुण मिळतील. पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी संघ 24, अनिर्णित निकाल 8 आणि बरोबरीच्या निकालासाठी 12 गुण मिळतील.

वाचा-इंग्लंडच्या विजयाचं धक्कादायक कारण, चॉकलेट-चिकनमुळे झाला ऑस्ट्रेलियाचा पराभव?

हे संघ घेणार भाग

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूजीलँड हे संघ भाग घेतील. झिम्बाब्वे संघाला आयसीसीने निलंबित केल्यामुळे ते या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत.

वाचा-IND vs WI : विंडीजवर दणदणीत विजयानंतरही विराटला टेन्शन!

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...