Home /News /sport /

IND vs ENG : अजिंक्य रहाणेचा स्पेशल विक्रम, विराटलाही जमला नाही

IND vs ENG : अजिंक्य रहाणेचा स्पेशल विक्रम, विराटलाही जमला नाही

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs England) अपयशी राहिल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण त्याने दुसऱ्या टेस्टमध्ये 67 रनची खेळी करत टीकाकारांचं तोंड बंद केलं. या अर्धशतकासोबतच अजिंक्य रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship) मध्ये एक हजारपेक्षा जास्त रन करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 14 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs England) अपयशी राहिल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण त्याने दुसऱ्या टेस्टमध्ये 67 रनची खेळी करत टीकाकारांचं तोंड बंद केलं. जेव्हा टीम इंडियाची बॅटिंग डगमगली होती, तेव्हा रहाणेने रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या मदतीने भारताचा डाव सावरला. कर्णधार विराट कोहली शून्यवर आऊट झाला होता. टीम इंडिया संकटात असताना अजिंक्य रहाणे संकटमोचक बनला. या अर्धशतकासोबतच अजिंक्य रहाणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship) मध्ये एक हजारपेक्षा जास्त रन करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या 15 मॅचमध्ये 1051 रन केल्या आहेत, यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये आतापर्यंत 5 खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. लाबुशेनने 13 टेस्टमध्ये 72.82 च्या सरासरीने 1,675 रन केले. लाबुशेनच्या नावावर सर्वाधिक 5 शतकंही आहेत. भारताविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये द्विशतक करणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, रूटने 18 मॅचमध्ये 53.44 च्या सरासरीने 1,550 रन केले, यात 3 शतकं आणि 8 अर्धशतकं आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 1,341 रनसह तिसऱ्या आणि इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स 1,220 रनसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराट टॉप-10 मध्येही नाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टॉप-10 मध्येही नाही. या यादीत विराट 15व्या क्रमांकावर आहे. विराटने 12 टेस्टमध्ये 46.35 च्या सरासरीने 788 रन केले, यात 2 शतकं आणि 4 अर्धशतकं आहेत. रहाणेनंतर रोहित शर्मानं भारताकडून सर्वाधिक रन केले. रोहितने 9 मॅचमध्ये 66 च्या सरासरीने 864 रन केले आहेत. रोहितच्या बॅटमधून 4 शतकंही आली, या यादीत रोहित 9व्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या