Live सामन्यात मैदानाबाहेर धावत सुटला फलंदाज आणि उतरवली पॅंट, पाहा VIDEO

Live सामन्यात मैदानाबाहेर धावत सुटला फलंदाज आणि उतरवली पॅंट, पाहा VIDEO

या घटनेनं पंच, खेळाडू, दर्शक, समालोचक सर्वच पोटधरून हसु लागले.

  • Share this:

अबू धाबी, 23 ऑक्टोबर : पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सध्या पात्रता फेरी होत आहे. अबु धाबी येथे आयसीसी रॅकिंगमध्ये नसलेल्या संघांमध्ये ही पात्रता फेरी होत आहे. दरम्यान कॅनडा आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या सामन्यात एक अजब प्रकार घडला. या सामन्यात कॅनडानं 50 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यातल्या एक घटनेनं सर्वांनी हैराण केले. ही घटना एवढी मजेशीर होती की पंच, खेळाडू ते सर्व दर्शकांना हसू अनावर झाले.

कॅनडानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता असताना नायजेरिया संघाचा फलंदाज सुलेमान रुन्सेवे (Sulaimon Runsewe) अचानक मैदान सोडून पळत सुटला. ही घटना सामन्याच्या आठव्या ओव्हरमध्ये घडली. सुलेमान का धावत आहे, हे कोणालाच कळले नाही. बराच काळ तो मैदानात आला नाही म्हणून पंच स्वत: मैदानाबाहेर गेला. सुलेमानला पाहण्यासाठी कर्णधार एडेमोला ओनिकाई त्याला पाहण्यासाठी ला. मात्र त्यावेळी सुलेमान पॅंट घालत होता. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-20 वर्षांआधीची गाडी आणि 90 हजारांचा पायजमा, धोनीचा Rich Look पाहिलात का?

लघुशंकेसाठी मैदानाबाहेर धावत सुटला फलंदाज

वाचा-भाग भाग, आया शेर आया शेर! विराटचा व्हायरल फोटो झाला ट्रोल

रुन्सेवे (Sulaimon Runsewe) अचानक मैदानाबाहेर जाण्याचे प्रमुख कारण होते लघुशंका. चालू सामन्यातच त्याला लघुशंकेसाठी जायचे होते. त्यामुळं तो धावत सुटला. मैदान सोडल्यानंतर थाई पॅडसोबतच त्यानं पॅंट उतरवली. हा व्हिडी पाहून तुम्हाला हसु आवरणार नाही.

वाचा-हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

दरम्यान, मैदानात पुन्हा पुनरागमन केल्यानंतर रुन्सेवे विशेष चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानं 27 चेंडूत केवळ 27 धावा केल्या. नायजेरिया संघानं कॅनडा विरोधात हा सामना 50 धावांनी गमावला. कॅनडानं प्रथम फलंदाजी करताना 159 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नायजेरिया संघाला फक्त 109 धावा करता आल्या.

First published: October 23, 2019, 6:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading