ICC T20 World Cup 2020 : टी-20च्या जगज्जेतेपदासाठी 16 संघ सज्ज, भारतासह 'हा' संघ प्रबळ दावेदार

ICC T20 World Cup 2020 : टी-20च्या जगज्जेतेपदासाठी 16 संघ सज्ज, भारतासह 'हा' संघ प्रबळ दावेदार

टी-20 रॅकिंगमध्ये पाकिस्तान पहिल्या तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. वाचा कोणते संघ आहेत प्रबळ दावेदार.

  • Share this:

दुबई, 31 ऑक्टोबर : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 16 संघ सामिल होणार आहे. जवळ जवळ एक महिना चालणाऱ्या वर्ल्ड कप 2020मध्ये जे संघ सामिल होणार आहेत, त्यांची यादी आता फायनल झाली आहे. याची माहिती टी-20 वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाईटनं दिली.

दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरल सामन्यांमध्ये 6 संघांची निवड झाली आहे. याआधी आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये असलेले 9 संघ एकमेंकाविरोधात भिडण्यास सज्ज आहेत. आता नव्यानं आलेल्या 6 संघानं क्वालिफायर फेरीत जिंकावे लागणार आहे. दुसरीकडे झिम्बाम्वे संघावर बंदी घातल्यामुळं ते या स्पर्धेत सामिल होणार नाही आहेत. मात्र त्यानंतर बंदी हटवल्यानंतरही त्यांना संधी मिळाली नाही.

दरम्यान सध्याच्या टी-20 रॅकिंगमध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपआधीच सातव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंका संघाकडून क्लिन स्विप मिळाली. इंग्लंडचा संघ दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र खरी स्पर्धा ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.

क्वालिफायर सामन्यात या संघांनी मारली बाजी

दुबईमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, नेदरलॅंड, नामिबिया आणि स्कॉटलॅंड यांच्यानंतर ओमननं ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपचे तिकीट मिळवले. हॉंग कॉंग संघाचा 12 धावांनी पराभव करत ओमननं टी-20 वर्ल्ड कपमध्ये जागा मिळवली. त्यामुळं हे संघ भारतासारख्या दिग्गज संघांविरोधात भिडू शकतात.

हे संघ याआधीच झाले आहे क्वालिफाय

आयसीसी टी-20 रॅकिंगनुसार पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलॅंड, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि वेस्टइंडीज हे संघ याआधीच क्वालिफाय झाले आहे. यातील ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ टी-20 वर्ल्ड कपचे प्रबळ दावेदार आहेत. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर सामना खेळण्याची चांगली संधी आणि फायदा असेल तर भारताचा संघ सध्या बलाढ्य आहे.

या संघांनी वर्ल्ड कप केला आहे नावावर

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे हे सातवे वर्ष आहे. आतापर्यंत भारत (2007), पाकिस्तान (2009), इंग्लंड (2010), श्रीलंका (2014) आणि वेस्ट इंडिज (2012, 2016) यांनी विजेतेपद मिळवले आहे. पुढच्या वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 15 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये अंतिम सामना होणार आहे.

करिना कपूर करणार ट्रॉफीचे अनावरण

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान मेलबर्नमध्ये होणाऱ्या पुरुष आणि महिला टी-20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. पुरुष टी-20 वर्ल्ज कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 दरम्यान तर महिला वर्ल्ड कप 21 फेब्रुवारी ते 8 मार्च असा खेळवला जाणार आहे. यासाठी ट्रॉफीचे अनावरण करिनाच्या हस्ते करण्यात येणार आहे.

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading