World Cup : पाक आऊट झाल्यानं सेमीफायनलचे चार संघ निश्चित

ICC Cricket World Cup पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानं न्यूझीलंडचे सेमीफायनलमधील स्थान पक्कं झालं.

  • Share this:

बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्यानं न्यूझीलंडचं सेमीफायनलचं स्थान पक्कं झालं आहे. सामना पाकिस्तानने जिंकला तर त्यांचे आणि न्यूझीलंडचे समान 11 गुण होतील. मात्र, धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड वरचढ ठरल्याने पाकचे आव्हान संपुष्टात आले आहे.

न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना तीन सामने गमवावे लागले तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे त्यांचे 11 गुण झाले असून ते गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी सेमिफायनलला स्थान पक्कं केलं आहे.त्यांनी इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचा पराभव करून गुणतक्त्यात 14 गुणांसह पहिलं स्थान कायम राखलं आहे.

ऑस्ट्रेलियानंतर भारतानं सेमीफायनलला धडक मारली. सध्या गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताने 6 सामने जिंकले आहेत. भारताचा एका सामन्यात पराभव झाला तर एक सामना पावसाने रद्द झाला. भारताचे 13 गुण झाले असून पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर भारताने बांगलादेशवर विजय मिळवून सेमीफायनलला धडक मारली. 13 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढचा सामना लंकेशी असून यात विजय मिळवल्यास भारताचे 15 गुण होतील. तर पराभव झाला तर भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्यामुळे पुन्हा भारत आणि इंग्लंड अशी लढत होईल.

न्यूझीलंडला अखेरच्या सामन्यात पराभूत करून इंग्लंडने सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. या पराभवाने न्यूझीलंडचे 11 गुण राहिले.

न्यूझीलंडने आतापर्यंत 9 सामन्यात 5 विजयासह 11 गुण मिळवले आहेत. एका सामन्यात पावसाने खोडा घातला. तर इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने न्यूझीलंडला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये फक्त एक सामना गमावला आहे. त्यांनी सेमीफायनलला जागा पक्की केली आहे. त्यांचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. आफ्रिका स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळं या सामन्यातील निकालाचा कोणत्याच संघावर फरक पडणार नाही. मात्र ऑस्ट्रेलियानं विजय मिळवल्यास गुणतक्त्यात ते अव्वल राहतील आणि चौथ्या क्रमांकावरील संघाशी त्यांचा सामना होईल.

लंकेचं आव्हान संपुष्टात आलं असून त्यांचा अखेरचा सामना भारताशी आहे.  सध्या त्यांचे 8 गुण झाले आहेत. त्यांचा 3 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव झाला. याशिवाय दोन सामने पावसाने रद्द झाले. याचाच फटका लंकेला बसला आहे.

इंग्लंडने भारतापाठोपाठ न्यूझीलंडला पराभूत करून सेमीफायनमध्ये प्रवेश केला. त्यांचे 12 गुण झाले असून गुणतक्त्यात ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आता दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांशी त्यांची सेमीफायनलला लढत होईल.

 बांगलादेशचं वर्ल्ड कपमधील आव्हान भारताविरुद्धच्या पराभवानंतर संपुष्टात आलं. त्यांनी वर्ल्ड कपमध्ये जबदस्त कामगिरी करत आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं.पण भारतासमोर त्यांचा निभाव लागला नाही.

लंकेनं इंग्लंडला पराभूत करून 6 गुण मिळवत आपणही शर्यतीत असल्याचा इशारा दिला होता.मात्र दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या सेमीफायनलमधील आशा संपुष्टात आणल्या. आता वेस्ट इंडिजविरुद्ध विजयानंतर त्यांचा पुढचा सामना भारताशी आहे.

पाकिस्तानची वर्ल्ड़ कपमधील कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं होतं.

वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. सेमीफायनलला ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ पोहचले आहेत.

वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 09:55 PM IST

ताज्या बातम्या