World Cup : सेमीफायनलमध्ये भारत नको रे बाबा, इंग्लंडला वाटतेय कसली भीती?

World Cup : सेमीफायनलमध्ये भारत नको रे बाबा, इंग्लंडला वाटतेय कसली भीती?

साखळी सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव सहन करावा लागला होता. मात्र आता सेमीफायनलमध्ये इंग्लंडला भारताची भीती वाटत आहे.

  • Share this:

लंडन, 06 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये लीग स्टेजमधील सामने आता संपले असून 9 आणि 11 जुलै रोजी सेमीफायनलचे सामने होणार आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या चार संघांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. दरम्यान कोणत्या संघांमध्ये सेमीफायनलचा सामना होणार हे भारत-श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर कळेल. जर ऑस्ट्रेलियानं आज सामना जिंकला तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलची लढत होणार आहे.

दरम्यान, साखळी सामन्यात भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता. मात्र, आता इंग्लंड संघाला एक वेगळीच भीती सतावत आहे. स्पोर्टसमेल या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारताविरोधात जेव्हा इंग्लंडचा संघ मैदानात उतरेल तेव्हा त्यांना चाहत्यांचे समर्थन मिळणार नाही. याचे कारण म्हणजे सेमीफायनलमध्ये भारतीय चाहत्यांची जास्त गर्दी असणार आहे. सेमीफायनलच्या तिकीट विक्रीसाठी आल्या नसल्या तरी साखळी सामन्यात भारताच्या सामन्यांसाठी झालेली गर्दी पाहता सेमीफायनलमध्येही तशीच स्थिती असणार आहे.

या तिकीट प्रकरणावरून आता इंग्लंड आणि आयसीसी यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या मते यजमानपदी असणाऱ्या देशासाठी वेगळ्या राखीव असाव्यात. तसेच त्यांनी 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या चाहत्यांना जास्त तिकीट द्याव्यात अशीही मागणी केली होती.

मैदान भरण्यावर आयसीसीचे प्राधान्य

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये मैदान भरण्यावर आयसीसीनं प्राधान्य दिले आहे. त्यामुळं कोणच्या देशाचे चाहते जास्त आहेत, यावर आयसीसीची तिकीट विक्री अवलंबून नसते, असेही स्पोर्टसमेल या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

इंग्लंडकरिता तिकीट वेगळ्या नाहीत

ईसीबीनं यजमान संघासाठी तिकीट वेगळ्या ठेवण्याच्या मागणीवर आयसीसीनं इंग्लंडसाठी तिकीट वेगळ्या नसणार आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे. सेमीफायनलच्या तिकीट या री-सेलींग वेबसाईटवर एक लाख रुपयांपर्यंत विक्री होत आहे.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

First published: July 6, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading